परभणी उर्सावर सिसीटीव्ही द्वारे नजर..

Spread the love

गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून उपाययोजना ;जागोजागी पोलीसांनी कुमक सीसीटीव्ही कॅमेरे तैनात

परभणी(प्रतिनिधी ) :
येथिल अनेक वर्षांपासूनची परंपरा असलेल्या हजरत तुराबुल हक यांचा उर्स यात्रा सुरू झाली आहे.गर्दीचा फायदा घेऊन गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परभणी पोलीसांनी खबरदारीचा उपाय म्हणून जागोजागी मोठी कुमक तैनात केली असुन त्यासोबतच सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले आहेत.त्यामुळे गैरप्रकार आळा बसणार आहे.
सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या हजरत तुराबुल हक यांच्या ऊर्स यात्रेस २ फेब्रुवारी पासून प्रारंभ झाला असुन, परभणी जिल्ह्यासह आजुबाजुच्या जिल्ह्यातील भाविक येत असतात.त्यामुळे आठ ते दहा दिवस येथे प्रचंड गर्दी दिसून होते ‌ या गर्दीत चोरटे आपला हात साफ करत असतात. महिला, युवतींची छेड काढण्याचे प्रकार आणि भांडण तंटे होत असतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिस चौकीत सीसीटीव्हीचा नियंत्रण कक्ष बसविण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील, दिनकर डंबाळे, पोनि. ननवरे, पोनि. डोंगरे, सपोनि. कसले, सपोनि. वामन बेले, सपोनि. पुंड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेची पूर्ण टीम बंदोबस्त करत आहे.

You cannot copy content of this page