बळीराजा साखर कारखान्याच्या १२व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

Spread the love

कार्यकारी संचालक अजय जाधव यांच्या हस्ते पुजन; ११ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्धीष्ठ

पुर्णा,ता. ६ (प्रतिनिधी)तालुक्यातील बळीराजा साखर कारखान्याच्या १२व्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवार, (ता.६) रोजी मोळी पूजनाने पार पडला. कारखान्याचे कार्यकारी संचालक अजय शिवाजीराव जाधव यांच्या शुभहस्ते सकाळी ९:३० वाजता हंगामाचा श्रीगणेशा झाला. यावेळी उत्पादक ऊसशेतकरी,अधिकारी, कर्मचारी,मान्यवर आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

पुर्णा तालुक्यातील बळीराजा साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात तब्बल११लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले असून, कारखान्याकडे ११.२५६ हेक्टर क्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांचा ऊस नोंदवला गेला आहे.सभासदांचा ऊस गाळप झाल्यानंतरउर्वरित बिगर सभासदांचा ऊस देखील गाळपासाठी स्वीकारणार आहे. अशी माहिती कारखान्याच्या प्रशासनाकडून देण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. नगराध्यक्ष उत्तमराव कदम होते.तर प्रमुख अतिथी म्हणून कारखान्याचे दिनकरराव जाधव, जेष्ठ समाजसेवक डॉ.दत्तात्रय वाघमारे,सुशिल वरपुडकर, मारोतराव बखाल,चांदोजी बोबडे, गोविंद चव्हाण, राजु धुत,नामदेव जाधव, डॉ. गुलाब इंगोले,व्यंकटराव पारवे,आनंद आजमेरा, दसरथ भोसले,नागनाथ शिंदे, निवृत्ती सोलव,गंगाधर धवन, प्रताप बखाल, बाबुराव बोबडे आदीं मान्यवर उपस्थित होते. गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी कारखाना प्रशासनाचे सरव्यवस्थापक भगवानराव मोरे, वर्क्स मैनेजर तुकाराम सुरवसे, चीफ केमिस्ट किरण मगर, मुख्य शेतकी अधिकारी रमेश पौळ, इलेक्ट्रीक मैनेजर नितीन गणोरकर, ऊस पुरवठा अधिकारी विनायक क-हाळे, रामजी शिंदे, बालासाहेब तिडके, केन अकाउंटंट रामेश्वर लंवदे, सुरक्षा अधिकारी विनायक कदम, टाइमकिपर गणेश सुर्यवंशी, केनवार्ड सुपरवायझर राजेंद्र मोगरगे, महेश हेबळे तसेच सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, शेतकरी व ऊस तोडणी-वाहतूक ठेकेदार उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव मोहीते यांनी केले तर आभार प्रदर्शन जगदीश जोगंदड यांनी मानले.

"बळीराजा साखर कारखाना हा शेतकरी प्रधान संस्था असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना सदैव तत्पर आहे. यंदाच्या हंगामात शासनाच्या धोरणा नुसार आणि FRP प्रमाणे ऊस दर दिला जाणार आहे. तसेच कारखान्याची गाळप क्षमता ३५०० मेट्रिक टनांवरून वाढवून ७५०० मेट्रिक टन प्रतिदिन करण्यात आली आहे. यंदाच्या मोसमात ११ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे. सर्व विभागांचे नियोजन सुसज्ज असून ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस कारखान्याकडे देऊन कारखान्याच्या प्रगतीत आपला सहभाग नोंदवावा, "असे आवाहन त्यांनी कार्यकारी संचालक अजय जाधव यांनी केले.

You cannot copy content of this page