राजर्षी शाहू महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्राचे वितरण

Spread the love

परभणी, ता.७(प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व श्री जगदंबा विद्या प्रसारक मंडळ, पूर्णा संचलित राजर्षी शाहू महाविद्यालय, परभणी येथे पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.

परभणीत राजश्री शाहू महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मोहनराव मोरे प्रमुख उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी महाविद्यालय, परभणीचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी हजेरी लावली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठलराव घुले यांनी अध्यक्षस्थानी राहून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.समारंभाच्या वेळी विचारमंचावर प्रा. डॉ.मुंजाजी गायके, प्रा.डॉ.सुरेश कदम व प्रा.अशोक चाटसे आदीं मान्यंवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन, प्रतिमापूजन व विद्यापीठ गीताने करण्यात आली.आपल्या प्रभावी भाषणात प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव म्हणाले की, “आपल्या जीवनातील पहिले गुरू म्हणजे आई-वडील असून ते आपल्या मुलांवर संस्कारांचे बीजारोपण करतात. महाविद्यालयीन स्तरावर प्राध्यापक विद्यार्थ्यांमध्ये योग्य संस्कार करून त्यांना समाजासाठी सक्षम पिढी बनवतात.”. संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहनराव मोरे यांनीही मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी रोजगारा भिमुख शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांमधून यश संपादन करावे असे आवाहन केले.या समारंभात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. सूत्रसंचालन प्रा.डॉ. सुरेश कदम यांनी केले,तर आभारप्रदर्शन प्रा.अशोक चाटसे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.समारंभ यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page