रामनवमी;रामनामाच्या गजरात प्रभावती नगरी दुमदुमली
खा.संजय जाधव यांनी आयोजित केलेल्या शोभायात्रेत; सजिव देखावे ठरले लक्षवेधी ;जयघोषाने प्रभावती नगरी दणाणली.
परभणी (प्रतिनिधी)
श्री राम नवमी निमित्त परभणी महानगरात खा.संजय जाधव यांनी आयोजित केलेल्या भव्यदिव्य शोभायात्रांमधून हजारो रामभक्तांनी अभूतपूर्व असा जल्लोष केला. “जय श्रीराम जय जय श्रीराम’ “श्री प्रभू रामचंद्र की जय’या जयघोषाने संपूर्ण बाजारपेठ अक्षरशः दणाणली. याशिवाय या शोभायात्रेतील सुंदर असे ऐतिहासिक व सजीव देखावे लक्षवेधी ठरले. उज्जैन येथील भव्य महाकाल देखावा तसेच अयोध्येतील वानसेना व भव्यदिव्य रामलल्लाची मूर्ती,असे अनेक देखावे लक्षवेधक ठरले.
रविवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सायंकाळी सात वाजता खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक राम जन्मोत्सवाची ही शोभायात्रा काढण्यात आली.यावेळी नामवंत अशी झांजपथके, वारकर्यांचा संघ, तसेच उज्जैन येथील भव्य महाकाल देखावा, अयोध्येतीन वानर सेना तसेच अनेक सजीव देखाव्यांचेही सादरीकरण ठरले..
त्या प्रमाणे , त्या पाठोपाठच सार्वजनिक जन्मोत्सव समितीची भव्यदव्य शोभायात्रा निघाली. रेल्वेस्टेशन मार्ग, नारायण चाळ कॉर्नर, गुजरी बाजार येथून ही यात्रा छत्रपती शिवाजी चौकात विसर्जित रात्री उशिरा विसर्जित झाली. परभणीतील राम भक्तांनी या आकर्षक व लक्षवेधी ठरणार्या शोभायात्रेत भगवे फेटे परिधान केलेल्या युवक व युवती, महिला व नागरिक हातात भगवे झेंडे राम नामाचा गजर करत निघाल्या होत्या.