ओबीसींच्या हक्कांसाठी लढा देण्यास समता परिषद सज्ज-नानासाहेब राऊत

Spread the love

पुर्णा तालुक्यातील चांगेफळ येथे समता परिषदेची बैठक संपन्न

पूर्णा ता.२१(प्रतिनिधी)ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी छगन भुजबळ हे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून सतत कार्यरत आहेत. ओबीसी प्रवर्गावर येणारे संकट परतवून लावणे हे समता परिषदेचे मुख्य ध्येय असून, ते साध्य करण्यासाठी कोणतीही लढाई करायला परिषद सज्ज आहे, ओबीसी प्रवर्गातील सुमारे चारशे जातींचे समाजबांधव पक्षीय विचार बाजूला ठेवून एकत्र राहावेत असे प्रतिपादन परिषदेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष नानासाहेब राऊत यांनी केले.

पुर्णा तालुक्यात चांगेफळ येथे समता परिषदेची आढावा बैठक नुकतीच पार पडली.या बैठकीस परिषदेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष नानासाहेब राऊत यांच्यासह समता परिषदेचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष नारायणराव अंबुरे, हिंगोली जिल्हाध्यक्ष चंदूजी लव्हाळे, मुंजाभाऊ गायकवाड, गोविंद यादव, एन. आय. काळे, विष्णू थोरात, रुपेश शिनगारे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संतोष गडगीळे होते.

यावेळी नानासाहेब राऊत यांच्या निवडीबद्दल पुर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानोबा वंजे, गंगाराम वंजे, चेअरमन नागोराव वंजे, श्रीराम गडगीळे, बबनराव सुर्यवंशी, सरपंच नारायणराव जाधव, डिगंबरराव गडगीळे, नाना गडगीळे, रमेश गडगीळे आदी मान्यवरांनी सत्कार केला.यानंतर त्यांनी कावलगांव, येथेही ओबीसी समाज बांधवांना भेटून चर्चा केली.माजी सरपंच अशोकराव गडगीळे यांनी प्रास्ताविक केले आभार उत्तम वंजे यांनी मानले.

You cannot copy content of this page