Parbhani News’श्री’ विसर्जनासाठी पोलीस दल सज्ज-पो.अ. रविंद्रसिंह परदेशी
परभणी जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त;६ उपविभागीय पोलीस अधिकारी,१८पोलीस निरीक्षक, १२० पोलीस अधिकारी तसेच ११५७ महिला व पुरुष पोलीस अंमलदारासह राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या आरसीपीचे तीन प्लॅटून, २४ स्ट्राइकिंग फोर्स तसेच ७७० होमगार्ड तैनात
परभणी ता.५ (प्रतिनिधी) :Parbhani police force ready for Sri immersionअनंत चतुर्दशी निमित्ताने होणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी परभणी जिल्हा पोलिस दल सज्ज झाला आहे. Superintendent of Police Ravindrasinh Pardeshi,जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली सहा उपविभागीय पोलीस अधिकारी, १८ पोलीस निरीक्षक, १२० पोलीस अधिकारी तसेच ११५७ महिला व पुरुष पोलीस अंमलदार यांची तैनाती करण्यात आली आहे. यासोबतच राज्य राखीव पोलीस दलाचे दोन प्लॅटून, आरसीपीचे तीन प्लॅटून, २४ स्ट्राइकिंग फोर्स तसेच ७७० होमगार्ड सज्ज आहेत.
प्रतिबंधात्मक कारवाई
भारतीय न्यायसंहिता कलम १६३ नुसार जिल्ह्यातील ३१० उपद्रवी इसमांना हद्दपार करण्यात आले आहे. तर ६३२ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. समाज माध्यमांवर देखील करडी नजर ठेवली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मिरवणूक मार्गावर लक्ष
- प्रत्येक मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
- महसूल, नगरपालिका, महावितरण अधिकारी व पोलीस यांच्या संयुक्त देखरेखीत रूट इन्स्पेक्शन करून आवश्यक दुरुस्ती व डागडुजी करण्यात आली आहे.
- विसर्जन स्थळांवर योग्य प्रकाशयोजना, सुरक्षाव्यवस्था व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
- जिल्हावासीयांना ठरवलेल्या ठिकाणीच विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मागील वर्षी परभणीकरांनी डीजे व डॉल्बीविरहित मिरवणूक काढून आदर्श घालून दिला होता. यंदाही त्याच पद्धतीने विसर्जन मिरवणुका काढण्यात याव्यात, असे आवाहन पोलीस प्रशासनाने सर्व गणेश मंडळांना केले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना शांततेत व सुसंवादातून विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











