परभणी;रविंद्र धर्मे,सौ. अंबिका डहाळे यांची जिल्हाप्रमुख पदी वर्णी
परभणी ता.२२(प्रतिनिधी)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते कट्टर शिवसैनिक रविंद्र धर्मे (सर) यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी,तर जिल्हा संघटीका म्हणून अंबीकाताई अनिल डहाळे यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातुन ता.२२ जुन रोजी प्रसिद्ध झाली आहे.सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शिक्षकी पेशातील कट्टर शिवसैनिक तर शिवसेनेच्या रणरागिणी मा.नगरसेविका यांच्यावर पक्षाने परभणी जिल्ह्यातील शिवसेना पक्ष बळकटीकरणाची जबाबदारी सोपवली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जालना, परभणी, नांदेड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी सामना मुखपत्रातून जाहीर केल्या आहेत.यात परभणी जिल्ह्यातील पाथरी व जिंतूर मतदार संघात जिल्हाप्रमुख म्हणून शिवसैनिक रविंद्र धर्मे (सर) यांची निवड केली आहे.त्यासोबतच परभणी गंगाखेड विधानसभा महीला आघाडीच्या जिल्हा संघटक म्हणून अंबीकाताई डहाळे यांची निवड केली आहे.
धर्मे तसेच सौ. डहाळे यांच्या निवडीबद्दल शिवसेना उपनेते खासदार संजय उर्फ बंडु जाधव, आमदार डॉ राहुल पाटील,माजी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव, जेष्ठ नेते प्रा धोंडगे सर,पैहलवान मारोतराव बनसोडे,अतुलतात्या सरोदे, सुधाकर खराटे,दशरथ भोसले,संजय सारणीकर, अनिल डहाळे,अनिल भाऊ जाधव,यांच्या सह पुर्णा तालुक्यातून संतोष एकलारे, साहेब कदम,काशिनाथ काळबांडे,मुंजा भाऊ कदम, श्याम कदम, गजानन हिवरे,शंकर गलांडे,प्रा.गोविंद कदम, मनोज उबाळे, शिवा पाथरकर, रमेश ठाकूर अप्पा बनसोडे, विकास वैजवाडे आदींनी निवडीचे स्वागत केले आहे.