Parbhani जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची तडकाफडकी बदली
संजयसिंग चव्हाण नवे जिल्हाधिकारी
परभणी ता.२०(प्रतिनिधी) Parbhani Collector Transferपरभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची मुंबई येथे तडकाफडकी बदली करण्यात आली असुन.त्यांच्या जागी मुद्रांक शुल्क विभागात संजयसिंग चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी (ता.२०) रोजी आदेश काढले आहेत.जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने आज मुंबईस तडकाफडकी बदली केली.मात्र त्यांच्या बदलीचे ठिकाण कळाले नाही.चव्हाण यांच्या बदली संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव संजय उमराणीकर यांनी या आदेश काढला आहे.
कोण आहेत संजयसिंह चव्हाण..
दरम्यान नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे एमपीएसीमधून १९९३ साली उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. ते मुळचे भोळी ( ता.खंडाळा, जि.सातारा) येथील आहेत. कायद्याचे पदवीधर असलेल्या श्री.चव्हाण यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज इचलकरंजी येथे प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच पुणे येथे रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, प्रांताधिकारी, शेती महामंडळ मुख्य प्रशासन अधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात सामान्य प्रशासनचे उपायुक्त म्हणून काम केले.












