परळीत कुलर च्या गोदामाला भीषण आग
परळीत कुलर च्या गोदामाला भीषण आग
तब्बल 3 तासाच्या प्रयत्नानंतर शेवटी अग्निशमक दलाला यश
परळी/प्रतिनिधी
शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या साई कुलर या कारखान्यास बुधवारी (दि२३) सायंकाळी 5:30 च्या सुमारास आग लागली तब्बल 3 तासाच्या प्रयत्ना नंतर ही आग आटोक्यात आली. लाखोंचे या आगीत नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
परळी शहरातील औद्योगिक वसाहतीत सोळंके बंधू यांचा साई कुलर नावाचा कुलर उत्पादन करणारा कारखाना आहे.या कारखान्यास बुधवारी सायंकाळी 5:30 च्या सुमारास अचानक आग लागली आगीचे लोट व धुरामुळे कारखान्यातील कामगारांना आग विजवता आली नाही.पाहता-पाहता आगीने अवघ्या 15 मिनिटात रौद्ररूप धारण केले .या कारखान्यात प्लॅस्टिक,लोखंडी कुलर बनविले जातात.सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने या काळात कुलर बनवून उन्हाळ्यात विकले जातात दरम्यान या अगीमुळे या कारखान्यातील लाखोंचा माल जळून खाक झाला आहे.तब्बल 3 तासाच्या प्रत्नानंतर परळी अग्निशमक दलाला यश आले असून ही आग शॉर्ट-सर्किट ने लागली अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.