निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर व शहर पोलिसांच्या वतीने शहरातून पथसंचलन
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर व शहर पोलिसांच्या वतीने शहरातून पथसंचलन
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्राचे 100 मीटर परिसरामध्ये मज्जाव कोणीही मोबाईल अथवा इलेक्ट्रिकल उपकरण
परळी /प्रतिनिधी.
233 परळी विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी संभाजीनगर पोलीस स्टेशन तसेच परळी शहर पोलिसांच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंंचालन करण्यात आले .
दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता शहर पोलीस स्टेशन समोरून सुरू झालेले हे पथसंंचालन वैद्यनाथ मंदिर मार्गे, आंबेवेस, गणेश पार, राणी लक्ष्मीबाई टॉवर, रोडे चौक, सिद्धार्थ नगर,उड्डाणपूल, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने परत कडबा लाईन, फाउंडेशन स्कूल, मार्गे परत नेहरू चौक व पोलीस स्टेशनला याची सांगता झाली.
या प्रसंगी परळी शहर पोलीस स्टेशनचे पीआय आर. के. नाचण, पोलीस निरीक्षक धनंजय ढोने, संभाजीनगर पोलीस स्टेशन, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, पोलिस अंमलदार 24 ,सीआयएसएफ कंपनीचे २८ कर्मचारी, होमगार्ड 48, तसेच दंगल नियंत्रण चे दोन पथक, 48 पो अंमलदार,
सहा अधिकारी आणि १४८ पोलीस आमलदार या पथसंचालनात सहभागी होते. दरम्यान प्रतिनिधीशी बोलताना जनतेने निर्भयपणे मतदान करण्याचा आव्हान केले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्राचे 100 मीटर परिसरामध्ये कोणीही मोबाईल अथवा इलेक्ट्रिकल उपकरण किंवा साहित्य घेऊन जाता येणार नाही अशी माहिती दिली शहर पोलीस ठाण्याचे पो.नी. आर के नाचण यांनी दिली.