मोटारसायकल धडकेत 1 ठार, 1 जखमी

Spread the love

मोटारसायकल धडकेत 1 ठार, 1 जखमी

परळी / प्रतिनिधी

परळी-चांदापूर मार्गावर मोटारसायकलच्या समोरासमोर धडकेत वीटभट्टीवर कामगार असलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि 11 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास घडली असून घटनास्थळी परळी येथील पत्रकार महादेव शिंदे यांनी तत्परता दाखवत मदत कार्य केले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चांदापूर रोडवर असलेल्या वीटभट्टी वर कामगार असलेला युवक हा आपल्या मोटार सायकलवर वीटभट्टी कडे जात असताना मोटार सायकल एम एच 22-इ 5343 व एम एच 44-एक्स 9970 याची समोरासमोर जोराची धडक होऊन यामध्ये वीटभट्टी वरील कामगाराचा जागीच मृत्यू झाला.मयत कामगाराचे नाव लक्ष्मण वैजनाथ गवारे
असून तो परळी येथील रहिवासी असल्याचे समजते.घटनास्थळी परळी येथील पत्रकार महादेव शिंदे हे त्या मार्गावर येत असताना सदरील अपघात घडताच त्यांनी मदतकार्य केले.

You cannot copy content of this page