महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कायदेशीर सल्लागार पदी अँड. मेहुल तोतला यांची नियुक्ती…
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कायदेशीर सल्लागार पदी अँड. मेहुल तोतला यांची नियुक्ती…
परळी …प्रतिनिधी.. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या विश्वस्त संस्थेच्या कायदेशीर सल्लागारपदी परळी येथील अँड .मेहुल कृष्ण गोपाल तोतला यांची नियुक्ती करण्यात आली असून संस्थेचे सचिव अँड.कमलेश पिसाळ यांचे तशा आशयाचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
आमदार रोहित पवार हे अध्यक्ष असलेल्या सदरील विश्वस्त संस्थेच्या अधिनस्त व संलग्न असलेल्या बीड, लातूर,उस्मानाबाद, परभणी, नांदेड, सोलापूर,व सातारा, येथील असोशियन चे कायदेशीर कामकाज पाहण्यासाठी सदरील नियुक्ती झाली आहे.
ॲड.मेहुल तोतला हे निवृत्त जिल्हा न्यायाधीश तसेच पूर्वी सहाय्यक धर्मादाय आयुक्त असलेले कृष्ण गोपाल तोतला यांचे ते चिरंजीव आहेत. ॲड. तोतला हे मागील अनेक वर्षापासून मराठवाड्यासह पुणे व मुंबई येथील धर्मादाय कार्यालयातील प्रकरणे हाताळीत असून त्यांच्या कामाची दखल घेऊन संस्थेने त्यांची नियुक्ती केली असून याबाबत त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.