दंडात्मक कार्यवाही करुन हा व्यापाऱ्याला कळत नाही म्हणुन तहसीलदार सुरेश सेजुळ व नायब तहसीलदार यांनी केला अनोखा उपक्रम
दंडात्मक कार्यवाही करुन हा व्यापाऱ्याला कळत नाही म्हणुन तहसीलदार सुरेश सेजुळ व नायब तहसीलदार यांनी केला अनोखा उपक्रम
शिवभोजन” देऊन परळी प्रशासनाची अशी ही व्यापाऱ्यावर गांधीगिरी
महाराष्ट्रासह बीड जिल्हयात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विकेंड लाॕकडाऊन घोषीत केला आहे.मेडीकल सेवा वगता संपुर्ण सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले असतांना परळीतील एका महाशय व्यापाऱ्यानी दुकान उघडे ठेवले होते.
परळी शहरातील स्टेशन रोड वरिल दुबे किराणा दुकान विकेंड लाॕकडाऊन असताना उघडले होते.याची खबर परळी तहसील प्रशासनाला मिळताच प्रशासनाच्या वतीने शिवभोजन थाळी देऊन दुकान सील केले.सदरची कारवाई तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी केली आहे.
दुबे किराणा दुकानाला यापुर्वीही दुकानावर दंडात्मक कार्यवाही करुन दुकाना सिल केले होते.परत या महाशय व्यापाऱ्यानी दुकान उघडे ठेऊन नियमाची पायमल्ली केली आहे.या व्यापाऱ्यापुढे प्रशासनाने हात टेकले आहेत. सांगुन बोलुन ,दंडात्मक कार्यवाही करुन हा व्यापाऱ्याला कळत नाही म्हणुन तहसीलदार सुरेश सेजुळ व नायब तहसीलदार यांनी दुबे किराणा मालकावर गांधीगिरी करत शिवभोजन थाळी देऊन एकप्रकारे कार्यवाहीच केली आहे.यामुळे तरी या व इतर चोरीचुपे दुकाने उघडी करणारावर असा तरी फरक पडला तर पडला असेच म्हणावे लागेल.