परळीत ब्राम्हण महिला मंच तर्फे परशुराम जन्मोत्सव साजरा
परळीत ब्राम्हण महिला मंच तर्फे परशुराम जन्मोत्सव साजरा
परळी वैजनाथ /
सकल ब्रह्मवृंदाचे आराध्य दैवत असेलेल्या भगवान परशुराम जन्मोत्सव शहरातील
ब्राम्हण महिला मंच तर्फे घरातच सर्व साधारण पने साजरा करण्यात आला.
भगवान परशुराम जन्मोत्सव दिनी प्रति वर्षी परळी शहरात भव्य-दिव्य मिरवणूक काढून साजरा करण्यात येतो परंतु कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम व अटींचे पालन करून भगवान परशुरामांना यावेळी वंदन करण्यात आले.श्री विष्णूंचा सहावा अवतार असणाऱ्या भगवान परशुराम यांच्या प्रतिमेला यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. घरातच सर्व साधारण पने जन्मोत्सव साजरा करण्यात आला.