Parli vaijanthगंगाखेड-परळी शिवकावड यात्रा वैजनाथांच्या नगरीत दाखल

Spread the love

परळीकरांकडून हर्षोल्लासात स्वागत; हजारों भाविकांनी घेतले कावड यात्रेचे दर्शन

परळी वैजनाथ ता.५(प्रतिनिधी)५ वे ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथांचा(Parali Vaijanth Jortiling) जलाभिषेक करण्यासाठी परळीतील गायत्री परीवारांकडून ऐन श्रावण मासात आयोजित करण्यात येणारी(Kavad Yatra) गंगाखेड ते परळी वैजनाथ शिवकावड यात्रा यंदाही (ता.३) रोजी सोमवारी हर हर महादेव,’बम बम भोले’ॐ नमःशिवायच्या गजरात मोठ्या भक्तीभावाने काढण्यात आली.ही कावडयात्रा सायंकाळच्या सुमारास वैद्यनाथ बाबांच्या नगरीत दाखल झाली. यावेळी कावड यात्रेचे दर्शन घेण्यासाठी  हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या परळीकरांकडून मोठ्या जल्लोषात हर्षोल्लासात जोरदार स्वागत करून मनोभावे दर्शन घेतले.

परळी येथिल गायत्री परीवारांकडून मागील ८ वर्षा पासून या शिव कावड यात्रेचे सातत्याने आयोजन केले जाते आहे.(ता.३)रोजी या कावड यात्रेने परळी येथून पहाटे ४ वाजता प्रस्थान केले होते. १०० ते १५० जणं पायी चालत गंगाखेड येथून गोदावरी नदीचे जल घेऊन परळी करीता मार्गस्थ झाले होते.रविवारी सायं ढोल ताशांच्या गजरात मोठ्या भक्ती भावाने’हर हर महादेव’,’जय भोले’, ‘वैजनाथ भगवान की जय’ असा जयघोष करीत ही कावड यात्रा परळी शहरात दाखल झाली.यात्रेच्या स्वागत करुन दर्शन घेण्यासाठी परळी शहर व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

शिवकावड यात्रेचे ८ वे वर्ष..

परळी शहरातील गायत्री कावड़ पंडित उत्तमजी शास्त्री (शर्मा) यांनी गेल्या ७ वर्षांपूर्वी सुरू केली होती.तेंव्हा पासून शिवकावड पदयात्रा पुर्वी परळी ते खडका विविध गावी ठिकानाहून गंगाजल आनत कावड़ यात्रा काढली जात असे त्यावेळी प्रतिसाद अप्ल होता मात्र मागील काही वर्षांपासून अनेक जण जोडले गेले आहेत. सेवेचे यंदा ८ वे वर्ष आहे.

You cannot copy content of this page