परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या आरक्षण सोडतीत १७ प्रभागांसाठी ३५ जागांचे आरक्षण जाहीर

Spread the love

नगराध्यपद सर्वसाधारण महीलेसाठी राखीव

परळी वैजनाथ (प्रतिनिधी): आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या ३५ सदस्यांसाठी (ता. ८)ऑक्टोबर रोजी नगरपरिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण सोडत काढण्यात आली.या वेळी स्थानिक नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच इच्छुक उमेदवार उपस्थित होते.

परळी वैजनाथ नगरपरिषद नगराध्यक्ष पद हे सर्व साधारण महीलेसाठी राखीव झाल्यानंतर बुधवारी एकूण १७ प्रभागांतील ३५ जागांसाठीचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून, यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि महिला यांना पतिनीधीत्व देण्यात आले आहे.

प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले —

प्रभाग 1: OBC महिला, खुला सर्वसाधारण

प्रभाग 2: SC महिला, खुला सर्वसाधारण

प्रभाग 3: OBC, खुला महिला

प्रभाग 4: SC, खुला महिला

प्रभाग 5: OBC महिला, खुला सर्वसाधारण

प्रभाग 6: OBC महिला, खुला सर्वसाधारण

प्रभाग 7: OBC महिला, खुला सर्वसाधारण

प्रभाग 8: SC महिला, खुला सर्वसाधारण

प्रभाग 9: SC, खुला महिला

प्रभाग 10: SC महिला, OBC, खुला महिला

प्रभाग 11: SC, खुला महिला

प्रभाग 12: खुला महिला, खुला सर्वसाधारण

प्रभाग 13: ST, खुला महिला

प्रभाग 14: OBC, खुला महिला

प्रभाग 15: OBC, खुला महिला

प्रभाग 16: OBC महिला, खुला सर्वसाधारण

प्रभाग 17: खुला महिला, खुला सर्वसाधारण

या आरक्षण सोडतीनंतर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार तयारीस लागले आहेत.

You cannot copy content of this page