परभणी;५ हजारांच्या ड्रग्ससह माफीया जेरबंद
विशेष पथकाची धडाकेबाज कार्यवाई
परभणी(प्रतिनिधी)
प्रतिबंधित ड्रग्स वर परभणी पोलीसांच्या विशेष पथकाने धाड टाकून ५ हजार रुपये किंमतीच्या ड्रग्स ईनजेक्शन सह माफीयाला जेरबंद करण्यात आले आहे. दि.22/ रोजी पोलिस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांचे विशेष पथक क्रमांक (03) मधील पोउपनि ढेमकेवाड व सोबतचे अंमलदार कोळेकर, जाधव, तेजनकर, बांगर, करकले असे पोलीस ठाणे नानलपेठ हद्दीत पेट्रोलिंग करीत त्यांना गोपनीय व खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी आरोपी शेख महेबुब शेख माजीद वय 19 वर्ष, रा. आरा मशीन जवळ, वांगी रोड, परभणी हा विनापरवाना शासनाने प्रतिबंधित केलेले ड्रग्ज स्वतःचे फायद्यासाठी विकण्यासाठी बाळगत आहे.
त्यावरून सदर पथकातील अधिकारी व आमदारांनी सापळा रचून सदर आरोपीस ताब्यात घेतले असता त्याचे ताब्यातून 5,022/- रु किमतीच्या MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP TERMIVA असे लेबल असलेल्या काचेच्या 10 ML च्या एकुण 15 बॉटल मिळून आल्यावरून त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशन नानलपेठ, परभणी येथे गु र.नं. 73/2025 कलम 210,278,125 भा.न्या.सं सहकलम 3,7 जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक परभणी श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली व श्री.यशवंत काळे, अपर पोलीस अधीक्षक परभणी यांचे नेतृत्वात पोउपनि ढेमकेवाड व सोबतचे अंमलदार कोळेकर, जाधव, तेजनकर, बांगर, करकले यांनी मिळून केली.