Pune Rain: राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याला रवाना झाले.
Pune Rain: राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याला रवाना झाले.
Pune Rain: राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याला रवाना झाले.
मुंबई, पुणे, ठाणे आणि राज्याच्या इतर भागात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे अतिवृष्टी आणि मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या मदतकार्याचा आढावा घेऊन पुण्याकडे रवाना झाले आहेत. पुणे शहर व जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि परिणामी पूरस्थिती पाहता ते स्वतः जिल्ह्यात बचाव आणि मदत कार्याचे नेतृत्व करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

Pimpri-Chinchwad Rain Update: पिंपरी चिंचवडच्या घरकुल सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी
पिंपरी चिंचवडमधील घरकुल सोसायटी पूर्णपणे पाण्यात बुडाली आहे. 165 पैकी 25 इमारतींच्या आवारात पूर आल्याने रहिवाशांची रात्रभर झोप उडाली आहे. गेल्या दशकभरापासून ही परिस्थिती वारंवार येत आहे.
पुणे पावसावर अजित पवार : रस्त्यांनी पाणी शोषण्याची क्षमता गमावली असून, खडकवासला धरणात क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाला आहे; अजित पवार यांनी पुण्यातील पूर आपत्तीचे कारण स्पष्ट केले.
पुण्यात पुढेही पाऊस राहणार आहे. मी तातडीने पुण्याला जात आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट केलं आहे. एकता नगरमध्ये स्वत: आयुक्त पोहचले आहेत, असं अजित पवारांनी सांगितले. जमीन कोरडी असेल तर पाऊस पडल्यानंतर पाणी शोषून घेण्याची जमिनीची तयारी असते. आत्ता जमीन सगळी गेले दोन-तीन दिवसाच्या पावसामुळे ओली आहे. पुण्यात पेव्हर ब्लॉक आणि सिमेट काॅक्रीट रस्ते आहे. पुण्यात सकाळी धरणातून पाणी सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सगळीकडे पाऊस असल्याने नदी ओव्हरफ्लो झाली असल्याने सकल भागात पाणी साचलेले आहे, असं अजित पवारांनी सांगितले.