पूर्णा;अंतर महाविद्यालय मैदानी स्पर्धेत गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाचा वरचष्मा..
लांबउडी, तीहेरीउडी प्रकारात पटकावले पारीतोषीक
पूर्णा/प्रतिनिधी
नुकत्याच लातुर येथे पार पडलेल्या अंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत पूर्णेच्या श्री.गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या दोन खेळाडुंनी लांबउडी, तीहेरीउडी प्रकारात प्रथम व द्वितीय पारितोषिक पटकावत वरचष्मा राखला आहे.
लातुर येथे स्वा.रा.तीर्थ मराठवाडा विद्यापीठ राजश्री शाहू महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री शाहू महाविद्यालयाच्या मैदानावर दि.२५ व २६ ऑक्टोबर रोजी अंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत पूर्णेतील श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या किरण न्यानोबा ढोणे व अंजली ज्ञानेश्वर कुऱ्हे या दोन विद्यार्थीनी लांब उडी,व तीहेरी उडी प्रकारात सहभाग नोंदविला होता.
मैदानी स्पर्धेत १०० मीटर व २०० मीटर मध्ये प्रथम तर तिहेरी उडी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. अखिल भारतीय अंतरविद्यापीठ मैदानी स्पर्धेसाठी या दोन्ही विद्यार्थिनींनी आपली निवड सार्थ ठरवली आहे.विद्यार्थींनींना मार्गदर्शन करणारे प्रा.सतीश बरकुंटे व किरण ढोणे व अंजली कु-हे यांच्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद अण्णा एकलारे, सचिव अमृतराज कदम,सहसचिव प्रा.गोविंदराव कदम,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार,उपप्राचार्य डॉ. शिवसांब कापसे,पर्यवेक्षक उमाशंकर मिटकरी व आबाजी खराटे यांनी अभिनंदन केले आहे.












