बहुजन समाज पार्टीच्या पूर्णा शहराध्यक्षपदी सुरेंद्र नरवाडे यांची निवड

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)
बहुजन समाज पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा माजी शहराध्यक्ष सुरेंद्र नरवाडे यांची पुन्हा एकदा बहुजन समाज पार्टीच्या पूर्णा शहराध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे पूर्णेकरांतून स्वागत केले जात आहे.
पूर्णा येथे गंगाखेड विधानसभेतील बहुजन समाज पार्टीची बैठक नुकतीच (ता.२८)फेब्रुवारी रोजी संपन्न झाली.यावेळी विधानसभा अध्यक्ष राजू खंदारे, विधानसभा उपाध्यक्ष अशोक पंडित,विधानसभा कोषाध्यक्ष भीमराव आवटे व गंगाखेड विधानसभा पुर्णा शहर अध्यक्ष पदी सुरेंद्र नरवाडे यांची निवड बसपा प्रदेश अध्यक्ष सुनील डोंगरे यांच्या आदेशाने, प्रदेश सचिव अनिरुद्ध रणवीर यांनी बसपा परभणी जिल्हा अध्यक्ष अशोक वायवळ यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले.यावेळी बसपा पदाधिकारी भीमराव जोंधळे,समाधान पोटभरे,धारबाजी गायकवाड,युवराज सूर्यतळे,प्रकाश खरे,अनिल इंगोले व बसपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page