पूर्णेत बसपा नेते मा. कांशिराम यांची जयंती हर्षोल्लासात साजरी
पूर्णा(प्रतिनिधी)
बहुजन समाज पार्टी,बामसेफचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार,४ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री,बहुजन नायक मा.कांशिरामजी यांचा ९१ व्या जन्मदिन येथिल बसपा शाखेच्या वतीने बसपाचे मा.प्रदेश सचिव ,देवराव दादा खंदारे तसेच जिल्हा प्रभारी भिमराव जोंधळे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
उत्तर प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री मा.कांशिरामजी यांच्या जयंतीनिमित्त पूर्णा शहरामध्ये बसपाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकुर्ती पुतळ्यास पुष्पहार टाकून फटाके वाजवून, हर्षोल्लासात पेढे वाटप करून मा.कांशीरामजी यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये,मा.प्रदेश सचिव, देवराव दादा खंदारे, जिल्हा प्रभारी भिमराव जोंधळे, गंगाखेड विधानसभेचे, धारबा गायकवाड, पूर्णा शहराध्यक्ष सुरेंद्र नरवाडे, भीमराव आवटे, चंद्रकांत कांबळे, अनिल इंगोले, गायकवाड साहेब, नारायण जोंधळे, कृष्णा धुमाळे,रामचंद्र दुशिंगे,राजू खंदारे ,विनायक गायकवाड, राजू कांबळे, भालेराव, जोगदंड,इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सूत्रसंचालन धारबा गायकवाड यांनी केले.