मानवतेचा संदेशवाहक, भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो-भदंत रत्नदीप थेरो यांचे प्रतिपादन

बुद्धविहार, पूर्णा येथे भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांचा अभिष्टचिंतन सोहळा
पूर्णा ता.११(प्रतिनिधी) “बुद्ध धम्मातील सर्वोच्च तत्त्व म्हणजे मानवता होय, आणि हे तत्त्व जीवनात उतरवून दाखवणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.उपगुप्त महाथेरो.” मानवतेचा खरा अर्थ आचरणातून दाखवणारे, बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारा साठी आयुष्य समर्पित करणारे अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो हे अद्वितीय आहेत.:“डॉ. उपगुप्त महाथेरो यांचे जीवन आणि कार्य” या विषयी मनोगत व्यक्त करताना भदंत रत्नदीप थेरो यांनी सांगितले.

पुर्णा येथे ९ ऑक्टोबर २०२५ रोजी बुद्ध विहार, पूर्णा येथे पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांचा अभिष्टचिंतन सोहळा अतिशय साध्या आणि सोज्वळ वातावरणात पार पडला.कार्यक्रमाचे संयोजन भदंत पयावंश व भदंत पयासार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ धम्म उपासक व सुप्रसिद्ध ठेकेदार यशवंतराव उबारे होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम, विचारवंत प्रकाश कांबळे, माजी उपनगराध्यक्ष उत्तम भैया खंदारे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे, तसेच डॉ. विनय वाघमारे यांचा समावेश होता.
या वेळी भदंत रत्नदीप थेरो (संभाजीनगर) यांनी त्यांनी पुढे नमूद केले की, “महाथेरो यांच्या कार्यावर मी सध्या पीएचडी संशोधन करत आहे.”भदंत पयावंश थेरो यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, “डॉ. महाथेरो यांच्या संस्कारांनीच माझे जीवन घडले. त्यांनी एका अनाथ बालकाला फक्त आधारच नाही, तर धम्माच्या शिकवणीने जगण्याची नवी दिशा दिली.”या कार्यक्रमात प्रकाश कांबळे, अशोक कांबळे, इंजि. पी.जी. रणवीर, लक्ष्मीकांत शिंदे, मंजुषा पाटील, भीमा वाहुळे आदींनी आपल्या भाषणा तून महाथेरो यांच्या मानवतेसाठी च्या समर्पित कार्याचा गौरव केला.धम्म उपासक पोलीस अधिकारी मिलिंद कांबळे यांनी उपस्थित मंडळींना भोजनदान व मिठाईचे वाटप केले. महिला मंडळासह शहरातील श्रद्धावंत उपासक–उपासिकांनी फलदान व पुष्पगुच्छ अर्पण करून पूज्य महाथेरो यांचा सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो म्हणाले, “बुद्ध धम्म हा मानवतेवर आधारित आहे. या तत्वांचे पालन करणे हेच खरे जीवन आहे. गेली पन्नास वर्षे मी या ध्येयासाठी कार्य करीत आहे.”या प्रसंगी नगरसेवक अॅड. हर्षवर्धन गायकवाड, धम्मदीप जोंधळे, पत्रकार विजय बगाटे, डॉ. केशव जोंधळे, डॉ. संदीप जोंधळे, शिवाजी थोरात, मुकुंद पाटील, प्रवीण कनकुटे, अतुल गवळी, किशोर ढाक यांच्यासह शहरातील सामाजिक,राजकीय,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले,तर समारोप आशीर्वाद गाथेने झाला.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्र्यंबक बरबडीकर, राम भालेराव, राजू जोंधळे, सुमेध काळे, राहुल दवणे, चरण आढाव आदींनी मोलाचे परिश्रम घेतले.












