पूर्णा बसस्थानकाची सुधारणा करुन नागरी सुविधा पुरवा अन्यथा आंदोलन
काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे परभणी विभागीय नियंत्रकांकडे मागणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा.!!
पूर्णा (प्रतिनिधी)४ एप्रिल २०२५
येथिल बसस्थानकातुन आजुबाजूच्या जिल्ह्यात जाण्यासाठी नसलेली बससेवा,बस स्थानकाला आलेली अवकळा, कर्मचाऱ्यांची वाणवा दुर करण्याच्या मागणी घेऊन परभणी जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया विभागाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागीय नियंत्रकांना ४ एप्रिल रोजी ए निवेदन देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला निवेदनात दिला आहे.
परभणी जिल्हा काँग्रेस सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष निखिल धामणगावे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्ट मंडळाने एसटी महामंडळाच्या परभणी विभागीय नियंत्रकांची भेट घेऊन पूर्णा येथील बसस्थानकाच्या दुरवस्थेचा गंभीर प्रश्न निदर्शनास आणून दिला आहे. प्रवाशांना बसस्थानकात बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही, तसेच स्वच्छता आणि पाण्याच्या सोयीचा मोठा अभाव,कंट्रोलर व अन्य कर्मचारी नियुक्त करावे, जिल्ह्यासह परजिल्ह्यात जाण्यासाठी सातत्याने बसेल चालू कराव्यात अवकळा आलेल्या पूर्णा बस स्थानकाचे तातडीने आधुनिकीकरण करावे. प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची तसेच कॅन्टीनची व्यवस्था त्वरित करावी. अशा मागण्या परभणी विभागाचे नियंत्रण यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. मागण्या बाबत तातडीने कारवाई न झाल्यास १५ दिवसांनंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.या निवेदनावर जिल्हाध्यक्ष निखिल धामनगावे यांच्या सह या. अध्यक्ष प्रल्हाद पारवे, जिल्हा उपाध्यक्ष वहीद कुरेशी, जिल्हा सचिव सुनील ठाकूर, सदाशिव वाटळ,शहर संघटक पांडुरंग कदम,विश्वनाथ मोरे,रफिक सर, तात्याराव ढोणे,अबुबकर युवक काँग्रेस,अमोल डाकोरे आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.