दारू सोडण्याचा सल्ला दिल्याचा राग; चुलत्याकडून पुतण्याचा निर्घृण खून
पुर्णा तालुक्यातील मौजे हिवरा येथिल घटना;चुडावा पोलीस मारेकरी चुलत्यास केले जेरबंद
पूर्णा ता.२९ (प्रतिनिधी): Purna Hiwara Murder News”दारू कशाला पितोस, दारू सोड, समाजात आपली बदनामी करु नकोस” असा सल्ला पुतण्याने दिल्याचा राग मनात धरून चुलत्याने स्वतःच्या सख्ख्या पुतण्यावरच चाकूने सपासप वार करून त्याचा खून निर्घृण केल्याची धक्कादायक घटना पूर्णा तालुक्यातील मौजे हिवरा येथे शुक्रवारी (दि. २९ ऑगस्ट) पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले आहे. चुडावा पोलीसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन मारेकरी चुलत्यास जेरबंद केले आहे.
स्वप्निल देवीदास निवडंगे (वय ३०, रा. हिवरा, ता. पूर्णा) असे असून, त्याचा मारेकरी आरोपी चुलत्याचे नाव डिगांबर सोपान निवडंगे (वय५०) वर्षेअसे आहे.या प्रकरणी प्रार्थमिक माहिती अशी की,हिवरा येथील देवीदास निवडुंगे व डिगांबर निवडुंगे या दोन भावांचे कुटुंब राहते डिगांबर यास केवळ तीन मुलीच आहेत तर देवीदास यांना स्वप्निल हा एकमेव मुलगा होता.तो गावात छोटेसे किराणा दुकानचालवत साखर कारखान्यात क्रेन आॅपरेटर म्हणून काम करत असे स्वप्निलने चुलता डिगांबर हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या असल्याने अनेकदा गावातील लोक व नातेवाईकांनी समज दिली होती. कुटुंबीयांनी त्याला वारंवार “दारू सोड, घर व समाजात नाचक्की करु नकोस” असा सल्ला दिला होता. याचाच राग मनात धरून डिगांबर निवडुंगेने शुक्रवारी पहाटे आपला पुतण्या स्वप्निलवर हा पुतण्यावर हातातील धारदार चाकुने हल्ला चढवला.त्याच्या मानेवर ,पोटावर छातीवर चाकूने सपासप वार करत त्याचा निर्घृण खून केला. गंभीर जखमी अवस्थेत स्वप्निलला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.
चुडावा पोलीसांनी आरोपीस केले जेरबंद..
चुडावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे हिवरा येथिल खुनाच्या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील, ठाणेदार सुशांत किनगे, जमादार दत्ता काकडे, अनिल मुंढे व पोहेकाॅ. चंद्रमुनी हानवते यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करत. मारेकरी चुलता डिगांबर सोपान निवडंगे यास पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे .
गावात शोककळा
या घटनेने मौजे हिवरा गावात शोककळा पसरली आहे. दारूच्या व्यसनामुळे कुटुंबातील नाते तुटून जाण्याचे हे आणखी एक उदाहरण ठरले आहे. स्वप्निल हा मेहनती व गावात मिसळून राहणारा म्हणून परिचित होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.












