“टॅलेंट सर्च परीक्षे”त जि.प.प्रा.शा कंठेश्वर तालुका पूर्णा शाळेचे यश
पूर्णा(प्रतिनिधी)
गंगाखेड तालुक्यातील पडेगाव या ठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या ‘टॅलेंट सर्च परीक्षा’ परीक्षेत पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सातवी ईयत्तेतील विद्यार्थ्यांनी पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक विष्णू रामराव बोबडे तृतीय क्रमांक श्रद्धा नरसिंग परडे व सहावा क्रमांक चंद्रकांत संतोष कदम या विद्यार्थ्यांनी पटकावत यश मिळवले आहे.
पडेगाव येथे रविवार ता.७ रोजी ‘टॅलेंट सर्च परीक्षा’ पार पडल्या.या परिक्षेत कंठेश्वर येथील यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांचा गौरव करुन यथोचित बक्षीस प्रमाणपत्र सन्मानचिन्ह भेटवस्तू व रोख रक्कम विद्यार्थ्यांना व शाळेला देण्यात आली यावेळी मा. शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे कार्यक्रमाचे आयोजक कारभारी नीरस यांची प्रमुख उपस्थिती होती. यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा कंठेश्वर येथील ग्रामस्थांनी शाळेत सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच हरिभाऊ कदम शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विठ्ठलराव कदम उपाध्यक्ष सुनील कदम पोलीस पाटील गजानन कदम तसेच प्रतिष्ठित नागरिक बालाजी कदम विद्यार्थ्यांचे पालक रामराव बोबडे नरसिंग परडे व संतोष कदम हे सपत्नीक उपस्थित होते या कार्यक्रमात यशवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सर्व मान्यवरा तर्फे सत्कार करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री देशटवार सर यांनी स्पर्धा परीक्षेचे महत्त्व विद्यार्थ्यांना व पालकांना पटवून दिले व तसेच मुंढे सरांनी या परीक्षेचा उद्देश विद्यार्थ्यांसमोर व पालकांसमोर सविस्तरपणे मांडला या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.