Purna;महादेव मंदिर संस्थानच्या अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायणास शनिवार पासून प्रारंभ

Spread the love

पूर्णा ता.१०(प्रतिनिधी) : शहरातील महादेव मंदिर संस्थान येथे शनिवार, (ता.११) ऑक्टोबर २०२५ पासून शुक्रवार, (ता. १७) ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह“श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा “ उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्याचे पारायणाचे नेत्तुत्व ह.भ.प. श्री.नारायण महाराज टाकळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.दररोज सकाळी व संध्याकाळी भक्तीमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, रात्री ८ ते ११ या वेळेत प्रसिद्ध किर्तनकार संतप्रवचन करतील.या सात दिवसांच्या पारायणात पुढील मान्यवर किर्तनकार आपले अमृतमय विचार मांडणार आहेत :

  • ह.भ.प. काशिनाथ महाराज माने (फुळकळकर)
  • ह.भ.प. रामकृष्ण महाराज (लोहगावकर)
  • ह.भ.प. आकाश महाराज मस्के (जामखेड)
  • ह.भ.प. भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज (पूर्णेकर)
  • ह.भ.प. रोहिदास महाराज मस्के (बामणी, ता. गंगाखेड)
  • ह.भ.प. अविनाश महाराज वाघ (भानेर, जि. जळगाव)
  • ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज (जवळेकर)

तसेच भागवत कथा वाचन दररोज सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सुप्रसिद्ध कथा वाचक ह.भ.प. अविनाश महाराज वाघ (भानेर) यांच्या द्वारे होईल.सोहळ्याचा समारोप शनिवार, दि. १८ ऑक्टोबर २०२५ (अ.कृ. द्वादशी) रोजी करण्यात येईल. या दिवशी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत श्रींची पालखी मिरवणूक निघणार असून, त्यानंतर ११ ते १ वाजेपर्यंत ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे काल्याचे किर्तन आयोजित केले आहे.कार्यक्रमानंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

संपूर्ण आठवडाभर पारायण, कथा व किर्तनांमुळे महादेव मंदिर परिसर भक्तिरसाने ओथंबून जाणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अध्यात्मिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page