पुर्णेत रविवारी महर्षी वाल्मीकी जयंतीचे आयोजन तैलचित्राची भव्य मिरवणूक, रक्तदान शिबीर व समाज प्रबोधन कार्यक्रम
पूर्णा ता.१०(प्रतिनिधी) : आदिवासी कोळी महादेव समाज संघटना शाखा पूर्णा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री महर्षी वाल्मीकी ऋषी सार्वजनिक जयंती महोत्सव कोळीवाडा, श्री साईबाबा मंदिर परिसर, कोळीवाडा, पूर्णा येथे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा महोत्सव रविवार, दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार असून दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिर, तर रविवार, १२ ऑक्टोबर रोजी श्री वाल्मीकी ऋषींच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक, स्वागत समारंभ व समाज प्रबोधन कार्यक्रम पार पडणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार मा. संजय (बंडू) जाधव करतील. प्रमुख उपस्थितीत आमदार रत्नाकर गुट्टे, विधानपरिषद सदस्य रमेशदादा पाटील यांच्यासह जीवराज डापकर (उपविभागीय अधिकारी गंगाखेड), माधवराव बोथिकर (तहसीलदार पुर्णा) समाधान पाटील (पोलीस उपविभागीय अधिकारी पूर्णा), विलास गोबाडे (पोलीस निरीक्षक पूर्णा), उत्कर्ष गुट्टे (मुख्याधिकारी, नगरपरिषद पूर्णा),
शरद कोळी, अविनाश कोळी, नागनाथ घिसेवाड, सुधाकर खराटे, विशाल कदम, साहेब कदम, लक्ष्मीकांत कदम, संतोष एकलारे, मुंजा कदम, पार्वतीबाई गाढवे, डी.एम. कोळी (पुणे), नितीन (बंटी) कदम, गणपत घोरपडे, शाम कदम, राजु नारायणकर, राज ठाकर, प्रताप कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष: महादेव भंगे,उपाध्यक्ष: अंकुश पानोडे,कार्याध्यक्ष: भिकाजी भंगे,सचिव: मनोज भिसे,सहसचिव: गंगाधर जगताप, शिवम जगताप, कोषाध्यक्ष: नवनाथ जंगले,सल्लागार: साहेबराव दांडगे, लक्ष्मण दांडगे, राम मोते, सखाराम बोराडे पिराजी जगताप, शिवराम भंगे, गणेश सूर्यवंशी, भगवान सोळंके, किशोर सूर्यवंशी, बबन घोरपडे, तुकाराम सोळंके, मारोती जगताप, राजेश सोळंके, माणिक भिसे ,सुमित चावरे, मनोज सौदा,विजय सौदा, सुरेश पोहाल आदीं आयोजन समीतीच्या वतीने करण्यात आले आहे.












