पूर्णा पालीकेत महीलाराज;नगराध्यक्षांसह १३ सदस्य महीलाच असणार;प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

Spread the love

पूर्णा ता.८(प्रतिनिधी): आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदांच्या आरक्षणानंतर आज बुधवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय नगरसेवक पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी निवडणूक परभणी श्रीमती अरुणा संगेकर यांच्या अध्यक्षतेखाली जुना मोंढा बाजारातील श्री गोंधळ सम्राट राजारामबापू कदम सभागृहात हा सोडत कार्यक्रम पार पडला.

या वेळी पूर्णा तहसीलदार माधवराव बोथिकर, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे, जिल्हा निवडणूक विभागाचे रेड्डी, कार्यालयीन अधीक्षक मुन्तेजीत खान, लेखापाल रामराव पवार, कर्मचारी,दिनेश मुळे,मुकुंद मस्के,नंदलाल चावरे,गणेश रापतवार,रश्मी पाठक,अभियंता अब्दुल हकीम,संजय दीपके, कैलास माकुलवार, अशोक पारवे, तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते.

कार्यक्रमात ‘ईश्वरी चिठ्ठी’ काढण्याचे काम अशफाक आणि आयरा या लहान मुलांनी केले. सोडतीचा निकाल घोषित होताच अनेक प्रभागांतील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.

नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्याने यंदाच्या निवडणुकीत महिलांचे वर्चस्व वाढणार आहे. एकूण ११ प्रभागांमधून २३ नगरसेवक निवडले जाणार असून १२ जागा महिला उमेदवारांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदा “पूर्णा नगरपरिषदेवर महिलाराज येणार” हे स्पष्ट झाले आहे.कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मनापासून परिश्रम घेतले.

जाहीर प्रभागवार आरक्षण पुढीलप्रमाणे

1. प्रभाग क्र. १ – मस्तानपूरा, गवळीगल्ली:

(अ) OBC महिला (ब) सर्वसाधारण

2. प्रभाग क्र. २ – आनंदनगर, आदर्श कॉलनी:

(अ) OBC महिला (ब) सर्वसाधारण

3. प्रभाग क्र. ३ – बोर्डीकर प्लॉटिंग, अलीनगर, क्रांतीनगर:

(अ) SC महिला (ब) सर्वसाधारण

4. प्रभाग क्र. ४ – आंबेडकरनगर:

(अ) SC (ब) सर्वसाधारण महिला

5. प्रभाग क्र. ५ – सिद्धार्थनगर:

(अ) SC (ब) सर्वसाधारण महिला

6. प्रभाग क्र. ६ – शास्त्रीनगर, व्यंकटी प्लॉट:

(अ) SC महिला (ब) सर्वसाधारण

7. प्रभाग क्र. ७ – महावीरनगर:

(अ) OBC महिला (ब) सर्वसाधारण

8. प्रभाग क्र. ८ – महादेव मंदिर, कोळीवाडा:

(अ) ST महिला (ब) OBC

9. प्रभाग क्र. ९ – भीमनगर, कुरेशी मोहल्ला:

(अ) SC महिला (ब) OBC (क) सर्वसाधारण महिला

10. प्रभाग क्र. १० – हरीनगर, पंचशीलनगर:

(अ) SC महिला (ब) सर्वसाधारण

11. प्रभाग क्र. ११ – रमाईनगर, चर्च परिसर:

(अ) SC (ब) सर्वसाधारण

एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने २०२५ नवीन आरक्षण पद्धतीने सोडत नामंजूर असल्याचे (ता.७) रोजी सुनावणी दरम्यान म्हटले आहे.त्यामुळे १९९६ प्रमाणे चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत करावी लागण्याची शक्यता आहे.तर याबाबत कोणतेही आदेश निवडणूक आयोगाने अद्यापपर्यंत दिलेले नसल्याने आयोगाच्या गाईडलाईन नुसार आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षण या आरक्षण सोडतीमुळे निवडणूक पूर्वतयारीला वेग आला असला तरी या आरक्षणात बदल होण्याचे चिन्ह दिसत आहेत.ते काहीही असो असे म्हणत आगामी काळात उमेदवारांच्या चर्चांना तसेच राजकीय हालचालींना सुरुवात होणार असून पूर्णा नगरपरिषद निवडणूक महिलांच्या सहभागामुळे अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

You cannot copy content of this page