ब्रह्माकुमारी तर्फे नेत्र रोग तपासणी व स्त्रीरोग तपासणी शिबिराचे आयोजन
माजी कृषी संचालक पंडित आप्पा बरदाळे यांच्या हस्ते उद्घाटन..
पूर्णा/प्रतिनिधी
ब्रह्माकुमारी सेवा केंद्र पूर्णा व लायन्स क्लब परभणी यांच्या वतीने महावीर नगर पूर्णा येथे नेत्ररोग व स्त्रीरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी शेकडो महिला व पुरुषांनी नेत्र तपासणीयाचा लाभ घेतला ही तपासणी पूर्ण विनामूल्य होती…. ब्रह्माकुमारी सेवा केंद्र च्या नवीन वास्तूतील स्थलांतर निमित्ताने स्नेह मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात सदरील तपासणी शिबिर ठेवण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी कृषी संचालक परभणी माननीय श्री पंडित आप्पा बरदाळे ,यांनी भूषविले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री रवी हरणे उपविभागीय कृषी अधिकारी परभणी, माननीय श्री डॉक्टर दत्तात्रय वाघमारे जेष्ठ समाजसेवक पूर्णा,माननीय सौ संगीता वाडकर माजी महापौर परभणी, ब्रह्माकुमार बाबासाहेब तांदळे भाई, तसेच या कार्यक्रमाच्या प्रमुख प्रवक्त्या ब्रम्हाकुमारी रेखा दीदी उमरेड नागपूर व ब्रह्माकुमारी अर्चना दीदी परभणी या आल्या होत्या दीदींनी मार्गदर्शनामध्ये जीवनातील ज्ञानाचे व राजी योगाचे महत्त्व यावरती मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या की आपण मोबाईल डिस्चार्ज झाला तर चार्जिंगला लावतो तर मग जीवनातील समस्यांशी सामना करत असताना मंथकून जाते तेव्हा काय करतो त्यावेळेस आपल्या मनाची शिव परमात्म्याशी जोडून शक्ती घ्यायला पाहिजे मनरूपी बॅटरी चार्ज करायला पाहिजे जेणेकरून आपण न थकता उत्साहाने नव्या जोमाने कार्य करू शकतो या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप करताना पंडित आप्पा बरदाळे यांनी राजीवगाचे त्यांच्या जीवनातील झालेल्या फायद्याचे वर्णन केले व ब्रह्माकुमारीच्या कार्याचे कौतुक केले. ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या पूर्णा येथील मुख्य संचालिका बिके प्रणिता यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमानंतर सर्वांनी ब्रम्हा भोजनाचा आस्वाद घेतला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमास आजूबाजूच्या चुडावा ,गोर ,धनगर टाकळी, निळा, खुजडा ,ताडकळस , वाई , सारंगी कावलगाव,पांगरा,परभणी येथून बरेच महिला व पुरुष आले होते