महापरिनिर्वाण दिन;पूर्णेत अभिवादनसभा,कॅडलमार्च
पूर्णा(प्रतिनिधी)
बोधीसत्व डॉ. बी. आर. आंबेडकर स्मारक व बुध्द विहार समिती,भारतीय बौध्द महासभा, पूर्णा. यांच्या वतीने थोर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ०६ डिसेंबर रोजी डॉ.आंबेडकर चौकात अभिवादन सभा तसेच कॅडलमार्चचे आयोजन करण्यात आले आहे.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं ६ डिसेंबर १९५६ साली महानिर्वाण झाले.जगभरात या दिनी त्यांना अभिवादन केले जाते. त्यानुसंगाने पूर्णा शहरातही त्यांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन सभा,कॅडल मार्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार शुक्रवारी सकाळी ०९:३० वा. डॉ. आंबेडकर चौक,
अमृत मोरे (जेष्ठ धम्म उपासक)यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. दुपारी १२ वा. बुध्द विहार येथे सामुहिक बुध्द वंदना व त्यानंतर शहराच्या प्रमुख मार्गाने शांतीमार्च व डॉ आंबेडकर चौकात अभिवादन सभा होणार आहे.तर सायंकाळी ०६ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथून निघेल सिध्दार्थनगर अमोल कॉर्नर रेल्वे कॉलनी विजयनगर- साठेनगर- भिमनगर महादेव मंदीर सोनार गल्ली छ. शिवाजी महाराज चौक बसवेश्वर चौक जामा मस्जिद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत कॅडल मार्च काढण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो (कार्याध्यक्ष, अखिल भारतीय भिक्खू संघ) ,भन्ते संघरत्न (आम्रवन महाविहार, (देवगाव फाटा)
अभिवादन सभेचे अध्यक्ष शामरावजी जोगदंड (माजी जिल्हाध्यक्ष, भा. बौ. महासभा, परभणी जिल्हा दक्षिण)
प्रमुख वक्ते डॉ. युवराज मोरे(केंद्रिय शिक्षक तथा ऑडिटर, ऑडिट कमिटी,भा. बौ. महासभा, महाराष्ट्र राज्य, मुंबई)रिपाईनेते प्रकाशदादा कांबळे(जेष्ठ आंबेडकरी विचारवंत, पूर्णा) यांची उपस्थिती राहणार आहे.तरी सर्व जनतेने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.