सिसीटीव्हीत कैद झालेले चोरटे चार दिवसांनंतर ही मोकाटच
तपासावर प्रश्नचिन्ह;बँकेत पिशवीला ब्लेड मारुन पळवले होते ३० हजार
पूर्णा(प्रतिनिधी)
बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या दोन महीलांच्या पिशवीला ब्लेड मारुन पिशवीतील ३० हजारांची रोकड पळवून नेल्याची घटना घडली होती.सिसीटीव्ही मध्ये चोरटे कैदही झाले. घटना घडून चार दिवसांचा कालावधी लोटला मात्र घटनेतील चोरटा पोलीसांना मिळत नसल्याने पोलीसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे..
याबाबत अधिक माहिती अशी की,पूर्णा शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत सोमवारी २ डिसेंबर रोजी खात्यातून रक्कम काढून घेऊन जात असताना तालुक्यातील सुकी येथिल शोभा राजु रणवीर व शहरातील गयाबाई लक्ष्मण राजभोज या दोन महीलांच्या पाळतीवर असलेल्या पाॅकीटमारांनी पिशवीला ब्लेड मारुन दोघींच्या पिशवीतील अनुक्रमे २० व १० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना दिवसाढवळ्या घडली होती.घटनेप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध सदरील महीलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटना घडल्यानंतर काही तासांतच चोरटा महीलेच्या पिशवीतून पैसे चोरत असल्याचे सिसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.चोरटा चोरी करताना स्पष्ट दिसत आहे.याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन चार दिवसांचा कालावधी लोटूनही चोरटा पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.मोकाट असलेल्या चोरट्यांना पोलीसांनी वेळीच जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.
__________________&_________________
पोलीसांकडून घटनेचा उलगडा होत नसल्याने शहरात पाॅकेट मार, मोबाईल चोर,दुचाकी चोरांचे प्रमाण फोफावले आहे.याप्रकरणी वरीष्ठांनी लक्ष घालून भुरट्या चोरट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.