महापरिनिर्वाण दिनी पूर्णेत शेकडो रक्तदात्यांचे रक्तदान

Spread the love


पूर्णा/प्रतिनिधी
विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती मंडळ व श्री गुरुगोविंद सिंग जी रक्तपेढी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करीत सहभाग नोंदवला.
प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, रिपाई नेते प्रकाश दादा कांबळे,अखील अहमद,उत्तम भैयाखंदारे, अँड.हर्षवर्धन गायकवाड, धम्मा जोंधळे,अनिल खर्गखराटे, ही नावं टाका गुरुगोविंद सिंग रक्तपेढीचे व्यवस्थापन व्यवस्थापक, आदीं मान्यवरांच्या उपस्थिती रक्तदान शिबिराचा समारंभ करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र पोलीस मिलिंद कांबळे, साहेबराव सोनवणे,प्रा. धम्मपाल वायवळ,अनुराथ पुंडगे, कपिल खरे,रौफसर कुरेशी,आनंद काचोळे, संकेत कांबळे,दादाराव अहिरे,चांदू सोनुले,केशव मकासरे,राजू ससाने,
गौतम ससाणे,सुनील वाहिवळ,भीमा वाहुळे, विशाल कांबळे,गणेश नागरे,अक्षय भोकरे,नरेश काळेवार,सिद्धांत शिंदे आदींनी परिश्रम घेत सहभाग नोंदविला.

You cannot copy content of this page