पूर्णा येथे ६८ वा महापरिनिर्वाण दिन संपन्न
पूर्णा/ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमिताने अभिवादन शोक मिरवणूक बुद्ध विहार पूर्णा येथुन शहराच्या मुख्य मार्गावरून डॉ बाबासाहेबांच्या तैलचित्राची रथात ठेऊन काढण्यात आली याची अभिवादन सभेत डॉ आंबेडकर चौक येथे करण्यात आले यावेळी भन्ते संघरल भन्ते संघरक्षित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी तुकाराम ढगे प्रमुख वक्ते प्रकाश कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उत्तम खंदारे दादाराव पंडित ॲड हर्षवर्धन गायकवाड सुनिल मगरे तुषार गायकवाड रौफ कुरेशी , मिलिंद कांबळे,अनिल खर्गखराटे आदि उपस्थित होते सुत्र संचलन श्रीकांत हिवाळे आभार त्र्यंबक कांबळे तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर ढाकरगे अमृत कऱ्हाळे सुरज जोंधळे साहेबराव सोनवणे राम भालेराव दिलीप गायकवाड पीजी रणवीर यांच्या बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी केले यावेळी श्रीगुरू गोविंद सिंग ब्लड बँक नांदेड यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला