युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील लाभार्थ्यांना शासकीय सेवेत रुजू करु घ्या

Spread the love

पूर्णेतील शेकडो लाभार्थ्यांचे शासनास निवेदन


पूर्णा(प्रतिनिधी)
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने लाडक्या भावांसाठी सुरू केलेल्या (युवा कार्य प्रशिक्षण योजना ) अंतर्गत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण पूर्ण झाल्या नंतर कायमस्वरूपी पदावर रुजू करून घेण्यात यावे यासाठी शहर व तालुक्यातील योजनेतील लाभार्थ्यांनी तहसीलदार पूर्णा यांच्या मार्फत शासनाला सोमवार दि.९ डिसेंबर रोजी निवेदन दिले आहे.
राज्यातील शिंदे सरकारने लाडक्या बहीणी पाठोपाठ लाडक्या भाऊरायासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अतर्गत ३५ वर्षाआतील तरुण तरुणींना शासनाच्या शासकीय निमशासकीय आस्थापनेवर नियुक्ती केली.पूर्णा तालुक्यातील शेकडो तरुण तरुणीं या योजनेत निवड झाले आहोत .त्यांनी ठरलेल्या कलावधीत ते प्रशिक्षण पूर्ण करत आहेत. प्रशिक्षनादरम्यान त्यांना शासकीय कामकाजाच्या विविध बाबीचे सखोल मार्गदर्शन व प्रशिक्षण अनुभव मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून शासनाची कार्यप्रणाली जवळून समजून घेण्याची संधि देखील मिळाली आहे.म्हणून, अनुभवाच्या जोरावर या योजणेअतर्गत दिलेले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर शासकीय, निमशासकीय पदावर काम करत असलेल्या तरुणांना शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे.अशी मागणी युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील लाभार्थ्यांनी शासनास दिलेल्या निवेदनात केली आहे.तसे झाले तर राज्याच्या प्रगतीत आपले योगदान देऊ शकु.असेही निवेदनात म्हटले आहे.सदरील निवेदन नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी स्विकारले.

You cannot copy content of this page