परभणी जिल्ह्यातील पूर्णेत एम.आय.एमचे राष्ट्रपतींनां निवेदन
पूर्णा (प्रतिनिधी)
येथील एम.आय.एम पक्षाच्या वतीने येथिल तहसीलदार यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती महोदयांना दि.६ डिसेंबर रोजी निवेदन देऊन नव्याने बाबरी मस्जिद बांधकाम करून मुस्लिम समाजास न्याय दयावा अशी मागणी करण्यात आली आहे.
देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेस काळीमा फासणारी घटना म्हणजे बाबरी मस्जिद शहीदची घटना होय. तरी भारतीय मुस्लिम समाजाने बाबरी मस्जिद घटनेचा 6 डिसेबर रोजी निषेध करून आपल्या मागण्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती यांच्या समोर निवेदनात मांडल्या आहे. न्यायालयाचा आदेश आसतांना ‘ आज पर्यंत बाबरी मस्जिद बांधकाम सुरू करण्यात आलेले नाही. असे वाटते की. देशाची सरकार एक प्रकारे कोर्टाच्या आदेशाचे उल्लघंन करून देशाची प्रतिमा मल्लिन करीत आहे.तसेच बाबरी मस्जिदच्या नावाखाली मुस्लिमांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करून देशात धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचे दिसते. संभल जामा मस्जिद व अजमेर दर्गाह व इतर मस्जिद यांना लक्ष्य करण्याचे नियोजनबध्द कटकारस्थान देशात सुरू असल्याचे दिसते. 1991 अॅक्टचे सर्रास उल्लघंन होत असल्याचे दिसते. तेव्हा महामहिम राष्ट्रपती यांनी या प्रकरणी त्वरीत लक्ष घालुन देशाच्या एकात्मेचे रक्षण करावे, अशी नम्र विनंती या निवेदनात करण्यात आली तसेच बाबरी मस्जिदचे बांधकाम सुरू करून जगाला एकात्मतेचे दर्शन करून दयावे, .या निवेदनावर मौलाना अहेमद रिजवी,मोहम्मद शफीक एम.आय.एम.,शेख इरफान, सरान बागवान,डॉ.भारत भाग्यवंत सामाजिक कार्यकर्ते,शेख इलियास,शेख महमूद,जावेद जेडी,शेख नईम,शेख जमीर समस्त मुस्लिम समाजाचे स्वाक्षऱ्या आहेत.