संविधान पुस्तीकेची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा..
राष्ट्रीय लिंगायत महामंचाचे जिल्हा अध्यक्ष नागेश नागठाणे यांची मागणी
पूर्णा(प्रतिनिधी)
परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृति पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या सोपान दत्तराव पवार वय : 45 वर्षे रा. मिर्झापूर ता. जि. परभणी विरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.अश्या मागणीचे निवेदन राष्ट्रीय लिंगायत महामंचाचे जिल्हा अध्यक्ष नागेश नागठाणे यांनी राष्ट्रपतींना तहसील प्रशासना मार्फत पाठवले आहे.
भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणी येथील पूर्णाकृति पुतळ्या समोर असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतिची मनुवादी प्रवृत्तिच्या सोपान दत्तराव पवार वय: 45 वर्षे रा. मिर्झापूर ता.जि.परभणी येथील रहिवाशी असून याने दि. 10 डिसेंबर 2024 रोजी संविधानाच्या प्रतिकृतिची विटंबना केल्याची अत्यंत निषेधार्य घटना घडली आहे. त्याचा आम्ही लिंगायत समाजाच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध करीत आहोत.सदरची घटना ही मुद्दाम केल्याचे संभवते. म्हणून या घटनेची सखोल चौकशी करुन या घटनेतील विकृत मनोवृत्तीच्या लोकांना त्वरित अटक करण्यात यावी व या घटनेला प्रवृत्त करणाऱ्या सर्व लोकांविरुध्द तसेच त्यांच्या पक्ष व संघटनांविरुध्द राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत व गुन्हेगारांना कडक शासन करण्यात यावे अशी लेखी मागनी राष्ट्रीय लिंगायत महामंच च्या वतीने करण्यात आली आहे.सदरील निवेदन दि.११ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लिंगायत महामंचाचे जिल्हा अध्यक्ष नागेश नागठाणे, श्रीनिवास तेजबंद यांनी नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या करवी राष्ट्रपतींना पाठवले आहे.