श्रीदत्तगुरुंच्या जयघोषात,गुलालाची उधळण करत दत्तजयंती उत्साहात साजरी
पूर्णा(प्रतिनिधी)
‘ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ च्या जयघोषात व गुलालाची उधळण करत श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीभावात साजरा करण्यात आला.यावेळी मंदीरावर लक्षवेधी दिव्यांची सजावट करण्यात आली होती. सहा वाजता आतषबाजी करण्यात आली. येथील श्री दत्त मंदिर संस्थांच्या वतीने श्री दत्त जन्मोत्सव शनिवारी ( दि १४) सायंकाळी सहा वाजता मोठ्या उत्साहात व भक्ती भावात साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती होती.
पूर्णा शहरातील श्रीदत्त मंदिराच्या समोरील प्रांगणात दिव्यांच्या माध्यमातून भव्य रांगोळी साकारण्यात आली होती. मंदिर संस्थांनचे डॉ. दीपक जोशी एरंडेश्वरकर व प्रकाशराव देशमुख यांनी मुख्य पूजा केली. याप्रसंगी राजू गुरु कुलकर्णी, सुधीर पेनुरकर, गोविंद चौधरी, अंजली जोशी, विजय कनकदंडे, विष्णू कमळू, अनंत जहागीरदार,मयुरेश जोशी, सायली जोशी, प्रदीप शिरपूरकर, लक्ष्मण वांगे, सतीश टाकळकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जेष्ठ पत्रकार जगदिश जोगदंड व सौ.सुक्षम जोगदंड यांनी श्री दत्त गुरुंचे मनोभावे पूजा करुन दर्शन घेतले.