श्रीदत्त जन्मोस्तव; पूर्णेतील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात धार्मिक कार्यक्रम संपन्न

Spread the love

सोमवारी महाआरतीने सांगता

पूर्णा(प्रतिनिधी)
शहरातील अमृतनगर येथिल श्रीस्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रात (दिंडोरी प्रणित) श्रीदत्त जयंती निम्मीत अखंड नाम जप यज्ञ सप्ताह व पारायण सोहळा चालू आहे. या सोहळ्याची सांगता सोमवारी १६ रोजी महाआरतीने होणार आहे.
प्रतिवार्षाप्रमाणे याहीवर्षी श्रीस्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रात श्रीदत्त जन्मोस्तवा निमित्ताने अखंड नाम जप यज्ञ सप्ताह व पारायणाचे आयोजन.९ डिसेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान करण्यात आले होते.मागील आठ दिवसांत सेवेचे याग-हवन, श्री गुरुचरित्र सामूहिक पारायण व विविध प्रकारच्या आध्यात्मिक सेवेचे आयोजन करण्यात आले होते.तसेच रविवार १५ रोजी १२;२९ वाजता श्रीदत्त जयंती उत्सव दुपारी महाआरती सहित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी श्री दत्तजन्म उत्सवासाठी पूर्णा शहर व पंचक्रोशीतील सेवेकरी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.सप्ताहची सांगता सोमवारी रोजी सकाळी. महाआरतीने होणार आहे. सप्ताह सांगता सोहळ्याला देखील मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व सेवेकरी व भाविक यांनी नियोजन केले.सप्ताह यशस्वीतेसाठी सेवाकेंद्रातील सेवेकरी परिश्रम घेत आहेत.

You cannot copy content of this page