शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी विठ्ठल कदम
पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर येथे शालेय क्षिक्षण समीतीची निवडणूक बिनविरोध
पूर्णा(प्रतिनिधी)
तालुक्यातील मौजे कंठेश्वर येथिल शालेय क्षिक्षण समीतीची निवडणूक बिनविरोध पार पडली.१६ सदस्य संख्या असलेल्या या समीतीच्या अध्वयक्षपदी विठ्ठल कदम यांची वर्णी लागली आहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कंठेश्वर येथे शालेय व्यवस्थापन समिती बिनविरोध निवड. जि प प्रा शा कंठेश्वर केंद्र धनगर टाकळी शाळेत दिनांक 19 डिसेंबर रोजी शालेय व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्यात आले पालक सभा घेऊन पालक सभेत सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून श्री विठ्ठल काशिनाथराव कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच सौ सोनाली सुनील कदम यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. एकूण 13 सदस्य बिनविरोध निवडण्यात आले व विद्यार्थ्यातून एक मुलगा व एक मुलगी असे दोन सदस्य घेण्यात आले शालेय व्यवस्थापन समिती बिनविरोध झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. शालेय व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्यासाठी धनगर टाकळी केंद्राचे केंद्रप्रमुख तथा कंठेश्वर शाळेचे मुख्याध्यापक श्री उमाकांत देशटवार व पोलीस पाटील श्रीरंग कदम सरपंच हरीभाऊ कदम शाळेतील सर्व शिक्षकांनी व गावकऱ्यांनी सहभाग घेतला.












