SCR Special Train;महाकुंभमेळा,अजमेर उर्स करिता विशेष रेल्वे धावणार
द.म.रेच्या नांदेड रेल्वे विभागाचा निर्णय; जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांची माहिती
पूर्णा(प्रतिनिधी)
आगामी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महाकुंभमेळा, अजमेर शरीफ उर्स करिता दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातुन नांदेड ,काचिगुडा, हैदराबाद,या स्थानकावरुन ५ विशेष रेल्वे नांदेड-अजमेर-नांदेड(मनमाड मार्गे),काचीगुडा-अजमेर-काचीगुडा,हैद्राबाद-अजमेर-हैद्रबाद,नांदेड-पटणा-नांदेड,काचिगुडा-पटणा-काचिगुडा(पूर्णा-अकोला मार्गे) चालवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे यांनी दिली आहे.
देशातील हिंदू धर्मीयांचे प्रतिक असलेल्या महाकुंभमेळा(KumbhMela) जानेवारी महिन्यात (Uttar Pradesh)उत्तर प्रदेशातील प्रयागराज (Pryagraj) येथे भरणार आहे. तर हिंदू -मुस्लिम (Hindu-Muslim) ऐक्याचे प्रतिक असलेल्या अजमेर शरीफ येथे ८१३ व्या ऊर्साला देखील याच दरम्यान सुरुवात होणार आहे. दक्षिण भारतासह मराठवाड्यातून या दोन्ही ठिकाणी कार्यक्रमास जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असल्याने रेल्वे प्रवाशांची रेल्वेला होणारी लक्षात घेऊन नांदेड रेल्वे विभागाने विभागातून अतिरीक्त ५ विशेष(Special Train)चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
कुंभमेळा, अजमेर शरीफ उर्स साठी या गाड्या धावणार
यामध्ये २ जाने रोजी नांदेड येथून २४ डब्यांची गाडी क्र.०७१८७/८८ (नांदेड-अजमेर-नांदेड) Nanded-Ajmerहि विशेष गाडी सकाळी ५;४५ वा. सुटून पूर्णा,परभणी, छत्रपती संभाजीनगर, मनमाड,भुसावळ, खंडवा मार्गाने धावणार आहे.तर परतीच्या प्रवासात याच मार्गाने ही गाडी ९ जानेवारी रोजी अजमेर येथुन रात्री ११:३० वाजता सुटणार आहे. गाडीक्र.०७७३२/३३(काचीगुडा-अजमेर-काचीगुडा)Kachiguda-Ajmer ही गाडी काचिगुडा स्थानकावरुन ३ जाने रोजी रात्री ११ वाजता सुटून नांदेड,पूर्णा, अकोला मार्गे खंडवा,भोपाळ अजमेर अशी धावेल तर परतीच्या प्रवासात ही गाडी अजमेर स्थानकावरुन ८ जाने रोजी सायं ७:०५ वाजता सुटणार आहे.ही गाडी १९ डब्यांची असणार आहे.गाडी क्र.०७७३०/३१(हैद्राबाद -अजमेर-हैद्राबाद) १९ डब्यांची ही गाडी हैद्राबाद येथून ०३जाने रोजी दु.४ वाजता सुटेल आणी नांदेड,पूर्णा,अकोला, खंडवा, उज्जैन,रतलाम मार्गे अजमेर येथे पोहोचेल परतीच्या प्रवासात०८ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता याच मार्गाने हैद्राबाद येथे पोहोचेल.
तर उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याला जाण्याकरीता नांदेड रेल्वे विभागातुन २२ डब्यांची गाडी क्र.०७७२१/ २२(नांदेड- पटणा-नांदेड) विशेष रेल्वे२२ जानेवारी रोजी रात्री ११ वा.नांदेड रेल्वे स्थानकावरुन सुटून पूर्णा,अकोला,इटारसी, जबलपूर, माणिकपूर मार्गे प्रयागराज चौकी येथे पोहोचेल परतीच्या प्रवासात ही गाडी २४ जाने रोजी दु ३:३० वाजता सुटून यांचं मार्गाने नांदेड येथे पोहोचेल.तसेच २५ जाने दुपारी ४:४५ वाजता काचिगुडा येथून गाडी क्र.०७७ २५/२६ (काचीगुडा-पटणा-काचिगुडा) मार्गे नांदेड,पूर्णा,अकोला, प्रयागराज,बकसर दानापुर मार्गे पटणा तर परतीच्या प्रवासात ही गाडी २७ जाने रोजी सकाळी ११:३० वाजता पटना येथून सुटून यांचं मार्गाने काचिगुडा येथे पोहोचेल.असणार असल्याची माहिती आहे.अजमेर शरिफ उर्स व उत्तर प्रदेशातील प्रयागराज महाकुंभमेळा जाणा-या भाविकांनी या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन नांदेड रेल्वे विभागाच्या विभागीय व्यवस्थापक जनसंपर्क अधिकारी यांनी केले आहे.