हुंड्यापायी सासरच्या जाचास कंटाळून विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या
परभणी जिल्हा आत्महत्या
हुंड्यापायी सासरच्या जाचास कंटाळून विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या
हुंड्यापायी सासरच्या जाचास कंटाळून विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या
पूर्णा तालुक्यातील सुहागन येथील ह्रदयद्रावक घटना
पूर्णा (जाकीर पठाण) : तालूक्यातील सुहागन येथील एका नवविवाहीतेने हुंड्याच्या पैशाच्या सासरच्या जाचाला कंटाळून अखेर कंटाळून जात तारीख १९ मार्च रोजी स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे.
या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात मयत विवाहीत मुलीच्या वडिलाच्या तक्रारीवरुन पतीसह सासरच्या नऊ जणावर हुंडाबळी कायद्यान्वे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.मन हेलावून टाकणा-या घटनेविषयी अधिक माहिती असी की,पूर्णा तालूक्यातील सुहागन येथील गंगाधर तुळशीराम वाघमारे यांचे नांदेड जिल्हा लोहा तालूक्यातील शेलवाडी येथील ज्ञानोबा मुंजाजी नकूले यांची मुलगी दिव्या (वय २० वर्ष) हीच्या सोबत तारीख २७/११/२०२३ रोजी हिंदू रितीरिवाजा प्रमाणे लग्न झाले होते.तेव्हा पासून दिव्या आपले पती गंगाधर वाघमारे यांच्या सोबत एकत्रीत कुटूंबात सुहागन येथे सासरी राहवयास होती.
लग्नामध्ये गंगाधर तुळशीराम वाघमारे यास एकुण दिड लाख रुपये हुंडा देण्याचे ठरले होते.त्यापैकी मयत मुलीचे वडील ज्ञानोबा नकूले यांनी लग्नाच्या खर्चामुळे एक लाख रुपये नगदी दिले होते व उर्वरित पन्नास हजार रुपये नंतर देणार असे ठरले होते.त्यानंतर मयत विवाहीतेचा पती गंगाधर वाघमारे यास मागील एका महिन्यापूर्वी शिक्षक म्हणून जिल्हा परिषद सिंधुदूर्ग येथे नौकरीला लागलेला नौकरी कॉल आला होता.तेव्हा मयत दिव्या हिस पतीने शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती.दिव्या ही रोज वडिलास फोनवर बोलून सांगत होती की,राहीलेले हुंड्याचे पैसे व माझ्या पतीस नौकरी लागणार असल्याने ते आता हुंड्यामध्ये मला मोटारसायकल पाहीजे असे म्हणत आहेत.माझा पती,सासू सासरे,भाया दिर मला हुंड्याबाबत विचारणा करुन मानसिक त्रास देतात व उपाशीपोटी ठेवून मारहाण करतात असे सांगत होती.त्यावरुन मयत मुलीच्या वडिलाने पंधरा दिवसाखाली जावयी व मुलीस घरी बोलावून जावयास विस हजार रुपये नगदी दिले व जावयी मुलीस कपडे करुन परत पाठवले.त्यानंतरही मुलगी वडिलास फोनवर सांगायची की,हुंड्यातील राहीलेले पैसे व मोटारसायकल बाबत ते आणखी विचारणा करतात.त्यानंतर शिवीगाळ करुन मानसिक शारीरिक छळ करुन हुंडा दिला नाहीतर जिवे मारण्याची धमकी देत आहेत.तसेच चारित्र्यावर संशय घेवून तूझ्या बापाने आम्हाला दिले तरी काय,मी आता जिल्हा परिषद शिक्षक आहे तुला जिवे मारुन मला कोणीही मी मागेल तेवढा हुंडा देतील,असे बोलत असल्याचे सांगून मी माझा पती व सासरचे लोकापासून त्रासून गेलेली आहे.तुम्ही यांना एकदा समजावून सांगून राहिलेले हुंड्याचे पैसे व मोटारसायकल देवून टाका.
१९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता देखील दिव्याने वडिलास फोन करुन ती टाहो फोडुन सांगत होती की,यांचे हुंड्याचे पैसे व मोटारसायकल घेवून द्या नाहीतर हे मला उद्या पर्यंत जिवे मारतो म्हणत आहेत.त्यावेळी वडिलाने तिला सांगीतले की,उद्या सकाळी हुंड्याचे पैसे घेवून तुझ्या गावाकडे सुहागनला येतो.नंतर परत सायंकाळी ७ वाजता जावयाचे फोनवर फोन केला असता त्यावेळेस मुलीने वडिलास सांगीतले की उद्या सकाळी तुम्ही लवकर या.
रात्री ९:३० वाजता अर्जून मुंजाजी नकूले राहणार शेलवाडी यांच्याकडून वडिलास कळाले की दिव्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.या घटनेनंतर दिव्याचे माहेरकडील सर्व नातेवाईक सुहागनकडे येत असताना तोवर दिव्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला होता.सदर घटनास्थळी पूर्णेचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ समाधान पाटील,पो.नी. विलास गोबाडे,सपोनि दर्शन शिंदे,महिला सपोनि रेखा शहारे,चाऊस यांनी भेट देवून पाहणी करत पंचनामा केला.या घटनेतील सुहागन येथील पती गंगाधर तुळशीराम वाघमारे,तुळशीराम पुंडलिक वाघमारे, गोदाबाई तुळशीराम वाघमारे,अरुण तुळशीराम वाघमारे,विष्णू तुळशीराम वाघमारे, कृष्णा तुळशीराम वाघमारे,गोपाळ तुळशीराम वाघमारे,गोपाळ तुळशीराम वाघमारे,गोविंद तुळशीराम वाघमारे,अनिल तुळशीराम वाघमारे सह सासर च्या आरोपीवर पूर्णा पोलिस ठाण्यात भादवी कलम ४९८ ए,३०४ ब,३०६,३२३,५०४,५०६,३४,४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि रेखा शहारे करीत आहेत.दरम्यान,मयत मुलीच्या माहेरकडील नातेवाईक दिवसभर ग्रामीण रुग्णालय व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होईपर्यंत ठिय्या मांडून होते.गुन्हा दाखल झाल्यानंतर सायंकाळी ४:३० वाजेनंतर शवविच्छेदन केलेला दिव्याचा मृतदेह जड अंतःकरणाने शेलवाडी कडे अंत्यसंस्कारासाठी घेवून गेले.या घटनेमुळे शेलवाडी गावावर एकच शोककळा पसरली आहे.आरोपी सर्व फरार झाले असून पूर्णा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.