भिमा कोरेगांव शौर्य दिन; पूर्णेत विजय स्तंभास अभिवादन
पूर्णा(प्रतिनिधी)
पूर्णा येथे सर्व आंबेडकर वादी कार्यकर्ते पक्ष संघटनेच्या वतीने डॉ आंबेडकर चौक येथे भिमाकोरेगाव शौर्य दिनाच्या निमिताने विजय स्तंभास अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूभदंत उपगुप्त महाथेरो पोलीस निरिक्षक विलास गोबाडे रिपाइ नेते प्रकाश कांबळे माजी उपनगराध्यक्ष उत्तम खंदारे नगरसेवक ॲड हर्षवर्धन गायकवाड तुषार गायकवाड सुनिल मगरे शामराव जोगदंड दिलीप गायकवाड यांच्या पदाधिकारी उपस्थित होते यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले त्या नंतर भिमा कोरेगाव विजय स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले उपगुप्त महाथेरो यांनी त्रिशरण पंचशिल बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी अभिवादन गीते व भिमा कोरेगाव इतिहासावर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमास मोठ्या संख्येने पुरुष महिला उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्र संचलन बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी गौतम एंगडे श्रीकांत हिवाळे अमृत कऱ्हाळे अतूल गवळी मिलिंद कांबळे उमेश बाऱ्हाटे साहेबराव सोनकांबळे यांच्या सह कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले