पूर्णेत गुन्हेगारीत होत आहे वाढ,बलात्कार, विनयभंगच्या घटनेत वाढ!
पूर्णेत गुन्हेगारीत होत आहे वाढ,बलात्कार, विनयभंगच्या घटनेत वाढ
बऱ्याच गुन्हातीत आरोपींना पोलीसची मुभा?
पूर्णा प्रतिनिधी :जाकीर पठाण:-
पूर्णेत गेल्या काही दिवसां पासून गुन्हेगारीत वाढ होत आहे,तालुक्यात बलात्कार, विनयभंगच्या घटनेत वाद होताना दिसत आहे स्थानिक पोलिस मात्र कोणत्या गुन्ह्यात किती पैसे मिळतात यातच मग्न असल्याचो चर्चा होत आहे इतकेच नव्हे पोलीसाच्या आयात खाऊ धोरणा मुळे दाखल झालेल्या गुन्हातील आरोपी बिनधास्तपणे कोणतीही जामीन न घेता मोकाट फिरत असल्याची चर्चा मात्र जोरात सुरू आहे त्यामुळे या कडे पोलिसाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी पुढे येत आहे
या बाबत अधिक वृत्त असे कि काही दिवसां पूर्वीच एका विद्यार्थीनी वर लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना ताजी असताना एका घरामध्ये क्लासेस घेणाऱ्या शिक्षिकेच्या पतीने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली असुन पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादी वरून पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील एका घरात खाजगी शिकवणी (ट्युशन) घेणाऱ्या शिक्षिका महिलेचा पती विवेक कोंडेकर या नरधमाणे एक अल्पवयीन मुलगी रोज प्रमाणे दुपारी ट्युशन साठी त्यांच्या पत्नीकडे घरी आली असता शिकत असताना मॅडम मुलीला अभ्यास देऊन किचन मध्ये गेल्यावर सदरील अल्पवयीन मुलीला जवळ बोलावून मांडीवर बसवले व स्वतःच्या मोबाईल मधील अश्लील व्हिडिओ दाखवत अश्लील चाळे केले सदरील प्रकरणाने घाबरलेल्या मुलीने घरीं गेल्यावर आई वडिलांनी विश्वासात घेऊन विचारले असता घडलेला प्रकार सांगीतल्यावरून सदरील नराधम विवेक कोंडेकर यांच्या वर पूर्णा पोलीस ठाण्यात दि.८ /४/२०२४ रोजी गुन्हा र न १०७ /२४ कलम ३५४ A , ८ , १२ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला अटक करण्यात आला असला तरी पोलीस ठाण्यात दाखल झालेले बऱ्याच गुन्ह्यातील आरोपीं कसल्या प्रकारची जामीन न कर्ता बिनदास्त शहरात वावरत असल्याची चर्चा मुळे पोलीसा बाबत शहरात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे या मुळे गुन्हेगारीं वर पोलिसाचे वचक राहिला नसल्याने गुन्हेगारीत वाढ होत आहे त्यामुळे या बाबी कडे पोलीसाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी पुढे येत आहे