पूर्णेतील पत्रकार भवनात दर्पण दिन साजरा

Spread the love

पूर्णा/प्रतिनिधी
येथील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने ६ जानेवारी रोजी दर्पण दिनाचे आयोजन करण्यात आले आले होते.पत्रकार भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष मुजीब कुरेशी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे, रिपाइं नेते प्रकाश कांबळे, माजी उपनगराध्यक्ष उत्तम खंदारे, पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, नगर परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक मुन्तजीब खान आदी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पुरस्कार प्राप्त पत्रकार विजय बगाटे व संतोष पूरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश कांबळे, उत्तम भैय्या खंदारे, मुख्याधिकारी गुट्टे,पो.नि.गोबाडे यांनी आपले विचार मांडले. प्रमुख उपस्थितात पत्रकार गजानन हिवरे, मोहम्मद अनिस बाबूमिया, शहराध्यक्ष मोहन लोखंडे, नागेश नागठाणे,राम भालेराव,सय्यद तौफीक, श्रीहरी घूले,नागेश नागठाणे,सलिम सुहागणकर,अनिल अहिरे, विजय सोनूले, कैलास बलखंडे, शेख जफ्फर आदींचा समावेश होता. प्रास्ताविक जगदीश जोगदंड यांनी केले. सुत्रसंचालन अमृत कऱ्हाळे यांनी केले. सतिश टाकळकर यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page