व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)
शहरातील व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने दर्पण दिन , राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
पूर्णा येथील जुना मोंढातील पत्रकार भवनात ता.६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता व्हाईस ऑफ मीडिया शाखेच्या वतीने दर्पण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमूख पाहूणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमानाथ शिंदे, पोलिस कर्मचारी बंडु राठोड उपस्थित होते.यावेळी पत्रकारीतेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी छत्तीसगड बिजपूर येथील पत्रकार मुकेश चंद्राकार यांच्या हत्या झाली होती.त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे पूर्णा तालूकाध्यक्ष आनंद ढोणे पाटील, नारायण सोनटक्के, शिवाजीराव बोबडे,सलिम सुहागनकर, विष्णू चापके, मारोतराव देसाई, संजय पांचाळ सह आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.या प्रसंगी आनंद ढोणे यांनी उपस्थित पत्रकारांना येत्या १९ जानेवारी रोजी गंगाखेड येथे व्हाईस ऑफ मिडीयाच्या वतीने होणा-या भव्य दिव्य दर्पण दिन सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी बोबडे यांनी केले.

You cannot copy content of this page