दर्पण दिन;पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा गौरव
पालीकेच्या क्रांतीज्योति सावित्रीबाई फूले सभागृहात दर्पण दिन साजरा
पूर्णा(प्रतिनिधी)
दर्पण दिन,राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून,पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत पुरस्कार प्राप्त झालेल्या पत्रकारांचा गौरव कार्यक्रमाचे आयोजन करुन दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पूर्णा शहरातील पालीकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात सोमवारी ६ जानेवारी रोजी पत्रकार नागेश नागठाणे, व त्यांचे सहकारी पत्रकार संजय वाघमारे व पत्रकार कैलास बलखंडे यांनी दर्पण दिना निमित्त पुरस्कार प्राप्त पत्रकार व जेष्ठ पत्रकारांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार समालोचक पत्रकार जगदीश जोगदंड तर प्रमुख अतिथी म्हणून संपादक राजेंद्र मूंदड़ा,मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अजय ठाकुर, सत्कार मूर्ती डॉ विजय कुमार कुलदीपके,राहुल पुंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रथमतः दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी बाळशास्त्री जांभेकर पत्रकारसंघ नाशिकच्या वतीने दिल्या जाणारा राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार प्राप्त डॉ.विजयकुमार कुलदीपके व डिजिटल मिडियात जलद गतिने प्रगती करणारे राहुल पुंडगे यांची अ.भा.मराठी पत्रकार परिषद डिजिटल मिडियाच्या परभणी महानगर उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. संपादक राजेंद्र मूंदड़ा यांनी वृत्तपत्र ते इलेक्ट्रॉनिक पत्रकारिता याबद्दलचे बारे वाईट अनुभव सांगितले. जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड यांनी पत्रकारांमध्ये एकता हा विषय फार महत्वाचा आहे.एकतेमुळे पत्रकार बंधवांच्या कुठल्याही प्रश्नाकडे आपणास लक्ष देऊन तो आपणास सोडवता येतात. यामुळे कोन छोटा को मोठा पत्रकार हा भेदभाव न करता सर्वानी एकत्र यावे असे आवहान केले. सदर कार्यक्रमास पत्रकार सतिश टाकळकर,अतुल शहाणे,शिवाजी बोबडे, कैलास बलखंडे , मास्टर अनिल अहिरे, संजय वाघमारे, विजय सोनुले, सय्यद सालिम, राजू गायकवाड़, विजय सोनुले, मनोज भूजबळ, जाकिर पठाण, दिलीप जोंधळे,आदिंची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयोजक पत्रकार नागेश नागठाणे, सूत्रसंचालन संजय वाघमारे, आभार कैलास बलखंडे यांनी व्यक्त केले.