पूर्णेत आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न
पूर्णा (प्रतिनिधी):-
आ.डाॅ.गुट्टे मित्र मंडळाच्या वतीने गंगाखेड विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार ड ॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन शहरातील सुमन मंगल कार्यालय येथे दि.७ जानेवारी रोजी करण्यात आले होते.यावेळी टी पॉईंट ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान भव्य मिरवणूक काढून आ.डॉ.गुट्टे यांचे भव्य असे स्वागत देखील करण्यात आले. यावेळी बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, केवळ आपल्या शहरातीलच नव्हे तर, संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक गावच्या समस्या व अडचणी दूर करणे माझे काम आहे. त्यामुळे येत्या काळात कोणताही दुजाभाव न करता केवळ विकासाला प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभाऊजी कदम,रासप प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव दादा रोकडे, संदीप आळनुरे पाटील, सुभाषराव देसाई, नंदकुमार डाखोरे, सरपंच उत्तमराव डोणे, वक्ते संदीप माटेगावकर, नितीन(बंटी) कदम, छगनराव मोरे, लिंबाजी भोसले, बकाल मामा, , जि. एन. डाखोरे, पांडुरंग बनसोडे , प्रविण अग्रवाल, बालाजी रुद्रावर, दत्ताजी भोसले, राजू खान, इक्बाल चाऊस, गीतारामजी देसाई, संभाजी मोहिते, मारोती मोहिते, प्रताप कदम, व्यंकटराव मोरे, दत्तराव पौळ, हृषीकेश सकनूर, यांच्यासह शहरातील व्यापारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, कार्यक्रमाचे औचित्य साधून गुट्टे (काका) मित्र मंडळाचे पूर्णा तालुका अध्यक्ष म्हणून सुभाषराव देसाई, तर तालुका प्रभारी म्हणून नितीन (बंटी) कदम यांची नव्याने नियुक्ती करून तसे निवड पत्र सुद्धा बहाल करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तमराव ढोणे आणि सूत्रसंचालन सुनील डुबे यांनी केले. तर आभार प्रताप कदम यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी परिसरातील नागरिक उपस्थित होते.