पँथर चळवळ नसती तर दलित वस्त्याचे मसणवटे झाले असते-राहुल प्रधान
पूर्णेत तथागत मित्र मंडळाचा नामविस्तार दिन सोहळा संपन्न
पूर्णा(प्रतिनिधी)
नामांतर लढयातील आंदोलनाने भविष्यातील पिढया घडवल्या आहेत पँथर चळवळ नसती तर दलित वस्त्याचे मसणवटे झाले असते त्या वेळस अन्याय अत्याचार व्हायचे आजही होत आहेत. आपल्या सोबत कोणीही नसले तरी बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे विचार आपल्या सोबत आहेत सर्वांनी एकत्र येऊन पुढची लढाई लढण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन पँथर राहुल प्रधान यांनी केले.
पूर्णा येथे तथागत मित्र मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाम विस्तार दिनाच्या कार्यकमाच्या निमिताने नामांतर लढ्यातील शहिदांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम खंदारे यांनी केले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो, प्रमुख वक्ते म्हणून युवा पँथरचे संस्थापक अध्यक्ष राहूल प्रधान तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे नेते प्रकाश कांबळे, ‘ डॉ विवेकमवाडे यांच्या सह यादवराव भवरे ,नामदेवराव राजभोज, दिलीप हनुमंते, अखिल अहमद, हाजी खुरेशी जाकीर कुरेशी, महेबूब कुरेशी, अब्दुल मुजीब
सत्कार मूर्ती म्हणून संविधान सन्मानार्थ शाहिद सोमनाथ सुर्यवंशी यांची मातोश्री विजयाताई सुर्यवंशी, शहिद विजय वाकोडे यांचे सुपुत्र आशिष वाकोडे स्वागताध्यक्ष दादाराव पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा अशोक कांबळे कॉ अशोक व्ही कांबळे दिलीप गायकवाड मुकूंद पाटील एम.यु खंदारे बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे, अमृत कऱ्हाळे, अतूल गवळी उमेश बाहाटे, ॲड हर्षवर्धन गायकवाड ,ॲड धम्मा जोंधळे, रौफ कुरेशी, राजकुमार एंगडे, अशोक भवरे आदीं उपस्थित होते . प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळ्यास मान्यवराच्या हस्ते अभिवादन करण्यात आले भदंत उपगुप्त महाथेरो यांनी त्रिशरण पंच शिल दिले यावेळी अशिष वाकोडे विजयाताई सुर्यवंशी भदंत उपगुप्त महाथेरो यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय समारोप प्रकाश कांबळे यांनी केला. सुत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले कार्यक्रमात शाहीर प्रकाश जोंधळे आणि संच यांचा प्रबोधन कार्यकम संपन्न झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रविण कनकुटे प्रशांत गायकवाड शिवा हतागळे बोधक तथागत मित्रमंडळा पदाधिकारी यांनी केले