अंशकालीन शिबीरात २६ श्रामणेरांना दिली दिक्षा
पूर्णेत दहा दिवसीय श्रामणेर शिबीरास सुरुवात; भिख्खू संघाची उपस्थिती
पूर्णा/प्रतिनिधी
येथिल बुद्ध विहारात गुरुवार दि.२३ जानेवारी पासून अंशकालीन श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास सुरुवात झाली असून,यावेळी भिक्खु संघाच्या वतीने उपस्थित २६ श्रामणेरांना दिक्षा व दसशील देण्यात आले.
पूर्णा येथे डॉ.बी.आर आंबेडकर स्मारक समिती व बुद्ध विहार समितीच्या वतीने परिसरात ३१ जानेवारी पासून २२ व्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.विहारात धार्मिक कार्यक्रमास सुरुवात झाली असून,भिख्खू संघाच्या उपस्थितीत अंशकालीन दहा दिवशीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास सुरुवात झाली आहे.प्रारंभी भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन भिक्खु संघाच्या वतीने पुष्प हार व पुष्प सर्मपीत करून अभिवादन करण्यात आले आहे. त्यानंतर त्रिशरण पंचशिल देण्यात आले. श्रामणेरांना श्रामणेर दिक्षा व चिवर देऊन दसशिल देण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पू भदंत डॉ उपगुप्त महाथेरो, भन्ते पंयारत्न, थेरो भन्ते पंयावंश,बौधाचार्य त्र्यंबक कांबळे, अतुल गवळी, अमृत कऱ्हाळे यांची उपस्थिती होती.कार्यकार्यक्रम यशस्वीतेसाठी बौद्ध महासभेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समीतीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.