देश विदेशातील भिक्खुंचा संविधान ग्रंथ देऊन सन्मान
संविधान गौरव समितीचा स्तुत्य उपक्रम
पूर्णा(प्रतिनिधी):
येथील २२ व्या धम्म परिषदेसाठी पूर्णा येथे परदेशातून आलेल्या बौद्ध भिक्खुचा सत्कार भारतीय संविधान गौरव समितीच्या वतीने २२साव्या धम्म परिषदेत आखिल भारतीय भिक्खु संघाचे कार्याध्यक्ष पूज्य.भदंत उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.या प्रसंगी लेह लडाख चे भिख्खू संघसेना महाथेरो, तसेच दक्षिण कोरियाचे भिक्खु.थेर. ईम. चांग. वू.आणि भिखु.लि.ची.रैन.यांना भारतीय संविधान ग्रंथाची प्रत,
स्मृती चिन्ह,शाल आणि पुष्पगुच्छ देउन त्यांचा सत्कार करण्यात आला.या सत्कारप्रसंगी गौरव समिती चे मुख्य संयोजक प्रकाश कांबळे, गटनेते उत्तम खंदारे,प्रा.अशोक कांबळे, कॉमरेड अशोक कांबळे,मुकुंद पाटील,गौतम काळे, शाहीर गौतम कांबळे आदिंची.प्रामुख्याने उपस्थिती होती.या सत्काराच्या अनुसंगाने आपल्याभारत देशाचे संविधान दक्षिण कोरिया आणि लेह लडाख ला बौद्ध भिक्खुनच्यामाध्यमाने पोहोंचल्याने गौरव समितीचे मुख्य संयोजक प्रकाश कांबळे यांनी समाधान व्यक्त करून बौद्ध भिक्खुनचे आभार व्यक्त केले.